घरताज्या घडामोडीशकिराच्या डान्सवर बॉलिवूडचा किंग खान फिदा

शकिराच्या डान्सवर बॉलिवूडचा किंग खान फिदा

Subscribe

बॉलिवूड किंग खान हा शकिराचा खूप मोठा चाहता असल्याबाबत शाहरुखने ट्विटर पोस्ट केलं आहे. अलीकडेच शकिरा आणि जेनिफर लोपेझ सुपरबॉउलमध्ये हाफटाइमध्ये एकत्र दिसल्या. यादरम्यान शकिरा आणि जेनिफर लोपेझने एकाच स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसल्या. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शकिराच्या याचं परफॉर्मन्सबाबत ट्विट केलं आहे.

- Advertisement -

शाहरुख खानने ट्विट करताना लिहिलं की, ‘खूप अद्भुत, खूप मेहतनी माझी आवडती.’ शाहरुख खानच्या या ट्विटला चाहते तुफान प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत २२ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून २ हजारपेक्षा अधिक रिट्विट केलं आहे. शकिरा आणि जेनिफर लोपेझने मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियममध्ये परफॉर्मन्स केला होता आणि यासाठी ६५ हजार प्रेक्षक उपस्थित होते.

शकिराने लोकप्रिय झालेले ‘शी वुल्फ’ आणि ‘व्हेनऐवर, व्हेनऐवर’ या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स केला. शकिरा आणि जेनिफर लोपेझचा परफॉर्मन्स लक्षात राहण्यासारखा होता. शाहरुख सध्या अभिनयापासून दूर आहे. त्याच्या अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Video : राखी सावंत म्हणते ‘घाबरु नका, करोना व्हायरस मी करणार नष्ट’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -