सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये शाहरूख खानची जबरदस्त एंट्री

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र 'टायगर ३' चित्रपटाच्या शूटिंगसाठी १० दिवस एकत्र असणार आहेत

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ बाबत अनेक नवनवीन बातम्या समोर येत असून सलमान खानच्या या चित्रपटात शाहरूख खान सुद्धा विशेष व्यक्तीरेखा म्हणून दिसणार आहे. त्यामुळे चाहते सलमान आणि शाहरूखच्या जोडीला अनेक वर्षांनंतर एकत्र पाहायला उत्सुक झाले आहेत.

शाहरूख आणि सलमान एका चित्रपटात

अभिनेता शाहरूख खान, सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये विशेष व्यक्तीरेखाच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आणि सलमान खान एकत्र ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी १० दिवस एकत्र असणार आहेत. एकीकडे सलमान खानची शाहरूखच्या ‘पठाण’ चित्रपटात हेलिकॉप्टरमधून धमाकेदार एंट्री होणार आहे, तर दुसरीकडे शाहरूख खानसाठी ‘टायगर ३’ मध्ये एक खास सीन तयार करण्यात आला आहे. मात्र अजून या सीनबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सलमान आणि शाहरूख एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांनी अनेक वर्षांपासून वाट पाहिलेली आहे.

या दिवशी प्रदर्शित होणार दोघांचा चित्रपट


दिग्दर्शक मनीष शर्मांचा ‘टायगर ३’ चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार असून या चित्रपटात सलमान सोबत अभिनेता इमरान हाशमी सुद्धा दिसणार आहे. तसेच कतरिना सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा या चित्रपटात दिसणार आहे. तसेच शाहरूख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. शाहरूखच्या या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम सुद्धा दिसणार आहे.

 


हेही वाचा :http://‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘हा’ अभिनेता करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण