Aryan Khan : आर्यनची अटक निव्वळ राजकारण, शाहरुखचा होतोय ‘तमाशा’, जाहिरात दिग्दर्शकाचा संताप

Shah Rukh Khan's brand value in danger? Prahlad Kakkar says Aryan Khan's case 'tamasha' not the reason
Aryan Khan : आर्यनची अटक राजकारण, शाहरुखशी निव्वळ 'तमाशा', जाहिरात दिग्दर्शकाचा संताप

कॉर्डीला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली आहे. यामुळे  शाहरुख खानच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शाहरुखने आजवर अनेक बड्या ब्रँडसाठी काम केले. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर एका मोठ्या बँडने शाहरुख खानसोबतचे संबंध तोडल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शाहरुखच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. यात जाहिरात विश्वातील जगातील लोकप्रिय दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी शाहरुख खानची पाठराखण करतं मोठं विधान केलं आहे.

जगभरातील प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शकांमध्ये प्रल्हाद कक्कर यांचे नाव घेतले जाते. आजवर त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर सारख्या नावाजलेल्या व्यक्तींच्या जाहिरातींसाठी दिग्दर्शन केले आहे. मात्र आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखला जाहिरात विश्वातून ज्याप्रकारे बाजूला केले जातेय त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी ‘शाहरुख खानसोबत जे काही घडतयं तो निव्वळ तमाशा आहे. तर आर्यन खानची अटक राजकारण आहे’ असं म्हटलं आहे.

यावर प्रल्हाद कक्कर यांनी पुढे म्हटले की, तुमच्या ब्रँडअॅम्बेसेडरचा मुलगा ड्रग्ज घेतो. तुम्ही मुलांना काय शिकवता? असं म्हणत प्रतिस्पर्धी ब्रँड त्याचा वापर करु शकतात… आर्यनला याप्रकरणात मुद्दाम अडकवत राजकारण केलं जातय… हे प्रत्येकाने समजावे… शेवटी आर्यनला सोडून द्यावे लागेल.

ब्रँड व्हॅल्यूसंदर्भात बोलताना ते म्हणाले, शाहरुखच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आता पूर्वीपेक्षा मोठी घट झाली आहे. पूर्वी त्याचे चित्रपट चालायचेय… त्याला पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमा गृहांवर गर्दी करायचे…. मात्र आत्ताच्या तुलनेत पूर्वी त्याला पाहण्यासाठी लोक अधिक उत्सुक असायचे… त्यामुळे आत्ता त्याच्या ब्रँण्ड व्हॅल्यूमध्ये मोठी घट झाली आहे. परंतु मुलाच्या अटकेमुळे त्याची ब्रँण्ड व्हॅल्यू कमी झाली असे म्हणणे चुकीचे आहे. असंही ते म्हणाले.

ते म्हणाले, शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा कठीण काळ आहे. पण त्याच्या ब्रँड व्हॅल्यूवर परिणार होईल असे नाही. ही वेळ गेली की तो पून्हा जोमाने सुरुवात करत उभा राहिल. असंही त्यांनी मुलाखतीत सांगितले.