Cruise Drugs Case: ‘या’ कारणामुळे आर्यन खान NCBच्या चौकशीसाठी राहिला गैरहजर

Shah Rukh Khan’s son Aryan Khan summoned by NCB for questioning again, here is why he did not appear
Cruise Drugs Case: 'या' कारणामुळे आर्यन खान NCBच्या चौकशीसाठी राहिला गैरहजर

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) विशेष तपास पथकाने (SIT – Special Investigation Team) अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु आज, रविवारी आर्यन खान एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचला नाही. तपास यंत्रणेकडून अधिकृत निवेदनात आर्यन चौकशीसाठी गैरहजर राहण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

काही तासांपूर्वी आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने चौकशीसाठी समन्स जारी केल्याचे समोर आले होते. परंतु आर्यन खान आज चौकशीसाठी हजर राहिला नाही. आर्यनला सौम्य ताप असल्यामुळे तो एनसीबी कार्यालयात दाखल राहिला नाही, असे एनसीबीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आर्यनसह एसआयटीने पहिल्यांदा अरबाज मर्चंट आणि अचित कुमारला समन्स जारी केला होता. दोघेही एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाले होते. एनसीबीचे विशेष पथक ६ प्रकरणाची चौकशी करत आहे. ज्यामधील सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. नवाब मलिक यांचा जावई समीर खानला देखील एसआयटीने चौकशीसाठी समन्स बजावला होता.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात २३ वर्षी आर्यनला ३ ऑक्टोबरला अटक केले होते आणि ३० ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला. न्यायालयाने १४ अटीशर्थीसह आर्यनला जामीन दिला होता, ज्यामध्ये दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची सूचना दिली होती.


हेही वाचा – आदिवासींच्या व्यथा, त्यांच्यावरील अन्याय दिसला नाही फक्त… ‘जय भीम’ सिनेमाच्या वादावर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण