घरमनोरंजनशाहरुखने उचलला आशा भोसलेंचा उष्टा कप; व्हिडीओ व्हायरल

शाहरुखने उचलला आशा भोसलेंचा उष्टा कप; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत असतो. सध्या शाहरुख त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. जो वर्ल्ड कप सामन्यादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये असं काही करत आहे ज्यामुळे अनेकडण त्याचं कौतुक करत आहेत.

शाहरुखने उचलला उष्टा कप

 

View this post on Instagram

 

A post shared by Maha (@mahasrk1)

रविवारी पार पडलेल्या वर्ल्ड कप सामन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये शाहरुखसोबत ज्येष्ठ गायिका आशा भोसले देखील दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये, सुरुवातीला आशा भोसले चहा पिताना दिसत आहेत त्यानंतर त्यांचा चहा पिऊन झाल्यावर त्यांच्या हातातील उष्टा कप शाहरुख स्वतःच्या हातात घेऊन बाजूला ठेवतो. शाहरुखचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत. दरम्यान, वर्ल्ड कप सामना पाहण्यासाठी शाहरुखसोबत त्याचे सर्व कुटुंबीय देखील आले होते. या सामन्यादरम्यान गौरी खान, सुहाना खान, आर्यनचे देखील अनेक फोटो व्हायरल झाले होते.

- Advertisement -

लवकरच शाहरुख दिसणार ‘डंकी’ चित्रपटात

शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : Photo : कतरिना कैफचा देसी लूक पाहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -