घरमनोरंजनघरच्या बाप्पाची झलक शेअर करत... शाहरुखने मागितली सर्वांसाठी 'ही' मन्नत

घरच्या बाप्पाची झलक शेअर करत… शाहरुखने मागितली सर्वांसाठी ‘ही’ मन्नत

Subscribe

संपूर्ण देशभरात गणोशोत्सवाची धामधुम सुरु आहे. बॉलिवूड कलाकार देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले आहे. शाहरुखने बाप्पाचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

शाहरुखने दाखवली बाप्पाची झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखने त्याच्या घरच्या बाप्पाचा फोटो शेअर करत लिहिलंय की, गणपती बाप्पा घरी तुमचे स्वागत आहे. “गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना खूप शुभेच्छा! श्री गणेश आपल्या सर्वांना आनंद, ज्ञान, उत्तम आरोग्य आणि खूप मोदक खाण्याची कृपा करो.” शाहरुखच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -
शाहरुखच्या ‘जवान’ला घवघवीत यश

किंग खान शाहरुख सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच 12 दिवसांपूर्वी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद देत आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 450 कोटी कमावले आहेत. शाहरुखच्या या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा देखील मुख्य भूमिकेत आहे.

 


हेही वाचा : Photo : रणवीर-दीपिकाचा देसी लूक सोशल मीडियावर चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -