चला हवा येऊ द्याच्या मंचावर शहाजी बापू पाटलांचं ‘ओक्केमध्ये’ स्वागत

शहाजी बाऊ पाटलांचा हाच दमदार अंदाज चला हवा येऊ द्याच्या मंचावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शहाजी बापू पाटील त्यांच्या पत्नीसह या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमध्ये’ या जबरदस्त डायलॉगने संपूर्ण महाराष्ट्रालाच खळकळून हसवलं. या जबरदस्त डायलॉगची आणि हा डायलॉग मारणारे शहाजी बापू पाटील यांनी गेले अनेक दिवस जोरदार चर्चा आहे. अजूनही या डायलॉगची जादू ओसरली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून जे काही सत्त्तांतराचे नाट्य रंगले त्या दरम्यान महारष्ट्रातून गुवाहाटीला गेलेले शिंदे गटातील शहाजी बापू पाटील यांची हा डायलॉग मारतानाची एक ऑडिओ क्लिप सुद्धा चांगलीच व्हायरल झाली होती. पण या सगळ्या राजकीय घडामोडी दरम्यान पाटलांच्या या डायलॉगने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधले. शहाजी बाऊ पाटलांचा हाच दमदार अंदाज चला हवा येऊ द्याच्या मंचावरही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शहाजी बापू पाटील त्यांच्या पत्नीसह या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.

हे ही वाचा –  सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या अफेयरच्या बातमीवरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

शहाजी बापू पाटील हे आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. सध्या महाराष्ट्रात त्यांच्याच डायलॉगची आणि त्यांची जोरदार चर्चा आहे. दरम्यान शहाजी बापू पाटील हे सपत्नीक चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. त्यावेळी ते त्यांचा प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखणार का ?
किंवा पाटील कोणते वक्तव्य करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शहाजी बापू पाटील यांच्या पत्नी रेखा पाटीलही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याच संदर्भातील काही फोटो शहाजी बापू पाटील यांच्या फॅन पेजवर सुद्धा शेअर करण्यात आले आहेत. शहाजी बापू पाटील यांना चला हवा येऊ द्याच्या मंचावर पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

हे ही वाचा –  ‘इमरजेंसी’चं टीझर पाहून अनुपम खेर यांनी केलं कंगनाचं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

हे ही वाचा – रविवारी रंगणार ‘होऊ दे चर्चा – अनन्या स्पेशल’ कार्यक्रम !

थुकरटवाडीतील अवलिया मंडळी त्यांच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांचं नेहमीच अनोख्या पद्धतीने स्वागत करत असतात. त्याचप्रामणे शाहज बापू पाटील आणि त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांच्याही स्वागताची जय्यत तयारी थुकरटवाडीत करण्यात येत आहे. त्यावेळी कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे एक भन्नाट गाणं सुद्धा सादर करणार आहेत. या एपिसोडचा एक प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रदर्शित करण्यात आला आहे.

हे हि वाचा – एनसीबीच्या रिपोर्टनंतर सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची क्रेझ ही देशभरातच आहे. आणि अशातच शहाजी बापू पाटील या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याने सर्व प्रेक्षकांचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागून राहीलं आहे. हा एपिसोड पुढील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे.