घरताज्या घडामोडीVideo - शाहरूख खानच बेताल वागणं बघून नेटकरी हैराण!

Video – शाहरूख खानच बेताल वागणं बघून नेटकरी हैराण!

Subscribe

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट या बॅनर अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘बेताल’ वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. वेब सीरिज पाहणाऱ्यांमध्ये हॉरर आणि थ्रिलर गोष्टी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.

- Advertisement -
काय आहे बेतालमध्ये

बेताल ही एका अशा गावातली गोष्ट आहे जिथे दोन दशकांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचा कर्नल बेताल आपल्या झोम्बी फौजेला घेऊन परत येतो. कर्नलची बटालियन हळूहळू गावातील जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पॅट्रिक ग्राहम यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

ट्रेलर शेअर करताना शाहरुखने लिहिले की, ‘तुम्ही राक्षसांसोबत युद्ध करायला किती दूर जाल? आमची दुसरी वेबसीरिज बेताल एक हॉरर आणि थ्रिरर गोष्ट आहे. २४ मे रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे. ‘बेतालमध्ये विनीत कुमार,  अहाना कुमरा,  सुचित्रा पिल्लई,  जितेंद्र जोशी, मंजरी पुपला आणि सायना आनंद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

- Advertisement -

मराठमोळा अभिनेता झळकणार

जितेंद्रने सोशल मीडियावर त्या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही सेकंदाचा असणाऱ्या या व्हिडिओत जवानाच्या गणवेशातील एक व्यक्ती आहे आणि त्याच्यामागे दोन व्यक्ती उभ्या आहेत. जितेंद्रने शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे वेबसिरीजविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.


हे ही वाचा – किंग खानच्या वेबसिरीजमध्ये झळकणार ‘हा’ मराठी अभिनेता!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -