घरमनोरंजनशाहिद कपूर आणि विजय सेतूपती यांच्या 'फर्जी' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

शाहिद कपूर आणि विजय सेतूपती यांच्या ‘फर्जी’ सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

Subscribe

अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज आपल्या आगामी ओरिजिनल सीरिज ‘फर्जी’चा ट्रेलर लॉन्च केला आहे. तसेच, या क्राईम ड्रामा सिरीजद्वारे, सुपरस्टार शाहिद कपूर, आणि विजय सेतुपती डिजिटलविश्वात पदार्पण करणार असून, यांसोबत मालिकेत प्रतिभावान अभिनेते के. के. मेनन, राशि खन्ना, भुवन अरोरा, रेजिना कॅसांड्रा आणि अमोल पालेकर मुख्य भूमिका साकारणार आहेत. D2R फिल्म्सद्वारा निर्मित, राज आणि डीकेसह , सीता आर मेनन आणि सुमन कुमारद्वारा लिखित आणि राज आणि डिकेद्वारा दिग्दर्शित, ‘फर्जी’ ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरमध्ये आपल्याला काही काळातच ठग बनणाऱ्या सनी (शाहिद)च्या आयुष्याची झलक पाहायला मिळेल. तथापि, एक तेजतरार आणि अपरंपरागत टास्क फोर्स ऑफिसर (विजय) यांनी देशाला त्याच्याकडून असलेल्या धोक्यापासून मुक्त करणे हे आपले ध्येय बनवले आहे.

- Advertisement -

आठ भागांची असलेली ‘फर्जी’ही अनोखी क्राईम थ्रिलर सिरीज, तीव्र आणि चपखल आहे. तसेच, शोमध्ये दिग्दर्शक जोडीचा ट्रेडमार्क ह्युमर पाहायला मिळणार असून, यामध्ये श्रीमंतांची बाजू घेणार्‍या व्यवस्थेला रोखण्यासाठी एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टने केलेला प्रयत्न पाहायला मिळेल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक संजय चौहान यांचे वयाच्या 62 वर्षी निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -