jersey Trailer: तब्बल २वर्षांनी शाहिद कपूरच्या ‘जर्सी’चा ट्रेलर रिलीज

जर्सी हा सिनेमाता येत्या ३१ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे

Shahid kapoor jersey movie Trailer release
Shahid kapoor jersey movie Trailer release

ब्लॉकबस्टर कबीर सिंह या सिनेमाच्या ग्रँड सक्सेस नंतर अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित जर्सी या सिनेमाची सर्वजण वाट पाहत होते. कोरोना आणि लॉकडाऊनमळे हा सिनेमात प्रदर्शनापासून लांबणीवर पडला. मात्र प्रेक्षकांची आतुरता आता संपली असून जर्सी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जर्सी हा सिनेमाता येत्या ३१ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. आपल्या देशात क्रिकेटला देव मानले जाते.त्यामुळे शाहिदच्या फॅन्सना शाहिद सोबतच क्रिकेट देखील पहायला मिळणार आहे.

जर्सी हा सिनेमा प्रसिद्ध साउथ इंजियन जर्सी या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. सिनेमाच्या तेलुगू वर्जनला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. हिंदी सिनेमाचे म्युझिक सचेत आणि परंपरा यांनी केले आहे. कबीर सिंह सिनेमाला देखाली दोघांच्या म्युझिकची साथ मिळाली होती. कबीर सिनेमातील गाण्यांप्रमाणे जर्सी सिनेमातील गाणी देखील तितकीच तगडी आणि धमाकेदार असतील अशी प्रेक्षकांनी अपेक्षा आहे.

संपूर्ण सिनेमा हा क्रिकेटवर आधारित आहे. शाहिद सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर ही मुख्य भूमिकेत आहे. तर शाहिद कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते पंकज कपूर आहे. दोघे बाप लेक पहिल्यांदा या सिनेमानिमित्त एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.

कसा आहे ट्रेलर?

जर्सी या सिनेमाच्या ट्रेलची सुरुवात ही शाहिद कपूर आणि मृणाल यांच्या भांडणाने होते. २ मिनिटे ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये शाहिदच्या कबीर सिंह सिनेमातील लुकची आठवण होते. सिनेमात शाहिद कपूर हा क्रिकेट प्रेमी दाखवला आहे. मात्र क्रिकेट फॅल्युअर असलेल्या शाहिदला आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचे आहे. शाहिदच्या मुलाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला मुलाला जर्सी विकत घ्यायची आहे मात्र जर्सी घेण्यासाठी शाहिदकडे ५०० रुपये देखील नाहीत. मजबूरीने तो त्याच्या पत्नीचे पैसे चोरतो. कर्जबाजारी असलेल्या शाहिदला पुढे त्याचा जुना कोच म्हणजेच पंकज कपूर भेटतोय. पंकज शाहिदला त्याच्या क्रिकेट अकॅडमीत ट्रेनरची ऑफर देतो आण सिनेमाचा ट्रेलर संपतो. आता आपल्या कुटुंबाचे, मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहिद काय काय करतो हे सिनेमा पाहिल्यावरच समजणार आहे.


हेही वाचा – Amol Palekar Birthday: ‘एँग्री यंग मॅन’च्या काळातील ‘कॉमन मॅन’