घरमनोरंजनशाहीदने 'या' ३ नावांमधून, निवडले 'झेन' नाव!

शाहीदने ‘या’ ३ नावांमधून, निवडले ‘झेन’ नाव!

Subscribe

शाहीद कपूरची आई निलीमा यांनी शाहीद आणि मिराला 'झेन' हे खास नाव सुचवल्याचं सूत्रांकडून समजत आहे.

अभिनेता शाहीद कपूर आणि मिरा राजपूत यांना नुकताच एक गोंडस मुलगा झाला. शाहीदने आपल्या मुलाचं नाव ‘झेन’ असं ठेवलं असून, शाहीद त्याच्या मुलाचं काय नाव ठेवणार? याची सर्वांनाच खूप उत्सुकता होती. याचं कारण म्हणजे   शाहीद आणि मिरा यांची पहिली मुलगी ‘मिशा’चं नाव, शाहीद मधील ‘शा’ आणि मिरा मधली ‘मि’ ही दोन अक्षरं एकत्र करुन ठेवण्यात आलं होतं.  त्यामुळे शाहीद आणि मिरा ‘झेन’चं नाव काय ठेवणार याकडे सर्वांचच लक्ष होतं. ‘झेन’ या नावाचाही एक खास अर्थ आहे. झेन हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ ‘ब्युटी’ किंवा सुंदरता असा होतो. दरम्यान सूत्रांनुसार शाहीदने आपल्या मुलाचं ‘झेन’ हे नाव एका खास व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं आहे. शाहीद कपूरची आई निलीमा यांनी शाहीदला झेन हे नाव सुचवल्याचं सूत्रांकडून समजत आहे.


वाचा : शाहीद कपूर ‘या’ खेळाडूची भूमिका साकारणार!

‘या’ ३ नावांचे पर्याय

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निलीमा यांनी सांगितल्यानुसार, शाहीद आणि मिराला यावेळी मुलगाच होणार असं मला वाटत होतं. शिवाय पहिल्या मुलाच्या वेळीच शाहीद आणि मिराने ठरवले होते की मुलगी झाल्यास तिचं नाव ‘मिशा’ ठेवायचं आणि मुलगा झाल्यास त्याचं नाव ‘झेन’ ठेवायचं’. दरम्यान निलिमा यांनी मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शाहिदला एकूण तीन नावांचे पर्याय सुचवले होते. ‘झेन’, ‘ईशान’ आणि ‘कामरान’ या तीन पर्यायांमधून झेन या नावाची अंतिम निवड करण्यात आली.

- Advertisement -


वाचा : ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटर शाहीदचा चाहता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -