घरताज्या घडामोडीशाहीदच्या बहिणीची मेहंदी रंगली, हळदीचे धम्माल व्हिडीओ पाहाच

शाहीदच्या बहिणीची मेहंदी रंगली, हळदीचे धम्माल व्हिडीओ पाहाच

Subscribe

अभिनेता शाहीद कपूरची बहीण सना कपूर हिचे मयंक पाहवाशी लग्न झाले. दरम्यान मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. सनाचे आई वडील म्हणजे बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक. दोघांनी लेकीच्या लग्नात धम्माल केली.

अभिनेता शाहीद कपूरची बहीण सना कपूर हिचे मयंक पाहवाशी लग्न झाले. दरम्यान मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. सनाचे आई वडील म्हणजे बॉलिवूड अभिनेते पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक. दोघांनी लेकीच्या लग्नात धम्माल केली. दरम्यान सुप्रिया आणि त्यांची बहिण रत्ना पाठक यांचा हळदीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघींनी लेकीच्या लग्नात पारंपरिक पंजाबी गाण्यावर ठेका धरला आहे.

सुप्रिया, रत्ना आणि सना यांच्यासोबत कपूर कुटुंबातील सदस्यांनी आनंदात मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पाडला. पाहा व्हिडीओ.

- Advertisement -

सना आणि मयंक यांचे लग्न महाबळेश्वरमध्ये होत आहे. सना प्रसिद्ध अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांची सून होणार आहे. सना मयंक पाहवा याच्याशी लग्न करत आहे. सनाने मयंकाच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर काढली आहे. नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान यांने सोशल मीडियावर सनाच्या मेहंदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivaan Shah (@thesurrealvivaanshah)

- Advertisement -

शाहीद कपूरच्या फॅनपेजवर लग्नातील कपूर कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. ज्यात शाहीद कपूर फारच स्टायलिश अंदाजात दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत शाहीद आणि सना यांच्यातील भाऊ बहिणीचे प्रेमळ नाते दिसून आले आहे.

तर दुसरीकडे शाहीदची पत्नी मीरा कपूर देखील नणंदेच्या लग्नात पूरेपूर आनंद घेताना दिसली. मीरा लग्नात फोटोशूट करताना दिसली. मीराने स्क्रिम कलरचा लेहंगा तर शाहीदने ब्लॅक कलरचा सूट घातला होता.


हेही वाचा – शाहिद कपूरची बहिण बनणार ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याची सून

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -