घरमनोरंजन'उरी'नंतर बॉक्स ऑफिसवर 'कबीर सिंग'चा धुमाकूळ

‘उरी’नंतर बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’चा धुमाकूळ

Subscribe

'कबीर सिंग' चित्रपटाची पाच दिवसांमध्ये १०० कोटीच्या घरात एन्ट्री

मागील दोन वर्षामध्ये बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर चांगलेच ट्विस्ट अॅंड टर्न्स बघायला मिळत आहे. बिग बजेटचे चित्रपट तसेच तगडी स्टार कास्ट असणारे चित्रपट जोरदार आपटले. मात्र लहान बजेट असणारे चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला शाहिद कपूरचा कबीर सिंग या चित्रपटाचे नाव या यादीमध्ये टॉपवर आहे. या चित्रपटाने पाच दिवसांमध्ये १०० कोटीच्या घरात एन्ट्री करत केवळ पाच दिवसामध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

‘कबीर सिंग’ने पहिल्या दिवशी २०. २१ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २७.९१ कोटी रुपये, तर सोमवारी आणि मंगळवारी या चित्रपटाने अनुक्रमे १७.५४ आणि १६.५३ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपटा एकूणच १०४.९० कोटी रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

एवढेच नाही तर चित्रपट प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी ग्रॉस कमाईमध्ये मोठी ऊसळी मारली आहे. यासोबत वर्षाच्या सुरूवातील प्रदर्शित झालेला चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ प्रमाणे ‘कबीर सिंग’च्या कमाईने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे.

- Advertisement -

चित्रपट समीक्षक तरण आदर्शने या कमाईची माहिती देताना कबीर सिंगची तुलना उरी: द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाशी करत कबीर सिंग देखील बॉकवस्टर चित्रपट ठरला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चाहत्यांचे मनं जिंकली आहे.

दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक बॉलिवूडमध्ये हिट

दक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाचा कबीर सिंग हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ मध्ये विजय देवरकोंडा सोबत शालिनी पांडेने मुख्‍य भूमिका साकारली होती. तर कबीर सिंगमध्ये शाहिद कपूर आणि कियारा आडवानीने मुख्य भूमिकेत दिसले होते. तेलगुमध्ये या चित्रपटाला संदीप वांगा रेड्डी यांनी दिगदर्शित केले होते, तर हिंदी रीमेकला ही संदीप यांनी दिगदर्शित केले आहे. या हिंदी रिमेकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -