घरमनोरंजनOnline शॉपिंग मीरा राजपूतला पडली महाग;ऑर्डर केलं स्लिंग कव्हर आणि मिळालं...

Online शॉपिंग मीरा राजपूतला पडली महाग;ऑर्डर केलं स्लिंग कव्हर आणि मिळालं…

Subscribe

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कदाचित थेट चित्रपटसृष्टीशी संबंधित नसली तरीही तिचा फॅन फॉलोव्हिंग एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मीरा राजपूत सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते, आणि मीराच्या पोस्ट्स दररोज सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसतात. यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतीच मीराची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना झालेल्या ऑनलाइन फसवणूकीविषयी सांगतांना दिसत आहे.

मीराने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो देखील शेअर केले आहेत ज्यामध्ये एक फोन कव्हर विचित्र स्थितीत दिसतेय. या अभिनेत्रीने फोटो शेअर करून यासंदर्भातील माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. यावेळी तिने असे सांगितले की, मी स्लिंग फोन कव्हर ऑर्डर केले होते, पण जेव्हा ही डिलिव्हरी मिळते तेव्हा ते दाखवल्याप्रमाणे नव्हते. या प्रकारानंतर मीराने नाराजी व्यक्त केली आहे. मीराने असे सांगितले की, तिने स्लिंग कव्हर ऑर्डर केले होते जेणेकरून वर्कआउट दरम्यान फोन ठेवणे सुलभ होऊ शकेल, परंतु डिलिव्हरीनंतर मिळालेल्या कव्हरने तिला खूप नाराज केले आहे.

- Advertisement -

मिराने आपल्या आयफोनसाठी महागडं कव्हर ऑर्डर केले होते. त्यासाठी तिने ऑनलाईन पेमेंटही केले होते. परंतु तिच्यासोबत फसवणूक करण्यात आली. तिने जो फोटो पाहून कव्हर ऑर्डर केले होते त्याऐवजी तिला दुसऱ्याच कव्हर पाठवण्यात आले. शिवाय या कव्हरची क्वालिटी देखील खूपच खराब आहे. त्या कव्हरला एक भोक देखील पडले आहे. हे भोक लपवण्यासाठी स्टिकर लावण्यात आले असल्याचे तिने सांगितले. हा प्रकार पाहून मिरा संतापली अन् तिनं आपला सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला.

- Advertisement -

मिराने इन्स्टाग्रामवर या कव्हरचे फोटो शेअर करत ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांसह शेअर केली. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेकांनी तिला या फसवणूक करणाऱ्या वेब सईटचं नाव विचारलं परंतु तिने कोणतीही माहिती अद्याप सांगितली नाही. शिवाय काही जणांनी तिला सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला देखील दिला आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -