‘कभी ईद कभी दिवाली’मधून शहनाज गिलची हकालपट्टी? शहनाजने दिली प्रतिक्रिया म्हणाली…

या सर्व बातम्यांवर शहनाजने आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. शहनाजने याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच सलमान खानच्या गुड लिस्टमध्ये असते. टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकस्मात मृत्यूनंतर शहनाज गिलने पूर्णपणे स्वताःला कामामध्ये गुंतवूण ठेवले आहे. मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानने शहनाज गिलला त्याच्या कभी ईद कभी दिवाली चित्रपटामध्ये एक महत्वाची भूमिका दिली होती, दरम्यान आता सलमानने शहनाजला चित्रपटातून काढलं असल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत शहनाज गिलने प्रतिक्रिया दिली आहे.

सलमानने शहनाजला चित्रपटातून काढलं?
मागील अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की, सलमानने त्याच्या चित्रपटामध्ये शहनाजला घेतलं होतं. त्यानंतर आता अशी बातमी समोर येत आहे की, सलमानने शहनाजला चित्रपटातून बाहेर काढलं असून शहनाजचं बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न तोडलं आहे. ही बातमी चाहत्यांसमोर येताच ते नाराज झाले होते. दरम्यान आता शहनाजने स्वताः याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे.

शहनाजने दिली प्रतिक्रिया


या सर्व बातम्यांवर शहनाजने आता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. शहनाजने याबाबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, याप्रकारचे रूमर्स माझ्या मनोरंजनाचे स्त्रोत आहेत आणि ते खूप उत्सुक आहेत की लोकांनी या चित्रपटाला पाहावं आणि या चित्रपटामध्ये मला पाहावं. शहनाजच्या या स्टोरी वरून लक्षात येतंय की, सलमान आणि तिच्यामध्ये काहीही बिनसलेलं नाही आणि सलमानने शहनाजला चित्रपटातून बाहेर देखील काढलं नाही.

‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाती स्टारकास्ट
सूत्रांच्या माहितीनुसार सलमान खान या आठवड्यात चित्रपटाचे हैदराबादमधील शेड्यूल संपवून राहिलेला पार्टचे शूटिंगसाठी तो मुंबईमध्ये परतणार आहे. ‘कभी ईद कभी दिवाली’ मध्ये सलमान खानशिवाय व्यंकटेश, पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, सिद्धार्थ निकम आणि जस्सी गिलसारखे कलाकार सुद्धा दिसून येणार आहेत.


हेही वाचा :‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनदरम्यान पुण्यामध्ये अक्षयने घेतला पुणेरी मिसळीचा आस्वाद; पोस्ट शेअर करत केलं कौतुक