Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत शाहरुखने मारली सनी देओलला मिठी; व्हिडीओ व्हायरल

‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीत शाहरुखने मारली सनी देओलला मिठी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल सध्या त्यांच्या ‘गदर 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली असून आत्तापर्यंत या चित्रपटाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशातच, या चित्रपटाच्या यशाची सक्सेस पार्टी सनी देओलने आयोजित केली होती. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. यावेळी अभिनेता शाहरुख खान, आमिर खान तसेच अनेक कलाकार उपस्थित होते.

सनी देओलच्या पार्टीमध्ये शाहरुख खान

2 सप्टेंबर रोजी रात्री सनी देओलने ‘गदर 2’ चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी शाहरुख देखील उपस्थित होते. तो दुबईवरुन मुंबईमध्ये पोहोचताच या पार्टीमध्ये उपस्थित राहिला. नुकताच या पार्टीमधील शाहरुखचा एक व्हिडीओ समोर येत आहे. जो पाहून त्याचे चाहते खूप खूश झाले आहेत.

शाहरुखने मारली सनी देओलला मिठी

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

- Advertisement -

‘गदर 2’च्या सक्सेस पार्टीत शाहरुख आणि सनी देओलने एकमेकांना कडकडून मिठी मारली. शिवाय यावेळी पापाराझींसमोर दोघांनी फोटो देखील काढले. त्यांचे चाहते हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत.

शाहरुख आणि सनी देओलचं झालं होतं भांडण?

मीडिया रिपोर्टनुसार, सनी देओल आणि शाहरुखमधील भांडण पूर्वी प्रचंड चर्चेत होते. दोघांमध्ये 30 वर्षांपासून डर चित्रपटाच्या सेटवर कटुता निर्माण झाली होती. मात्र, आता इतक्या वर्षानंतर दोघांमध्ये पुन्हा चांगली मैत्री झाली आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा : प्रत्येक पुरुषामध्ये स्री शक्ती असते – आयुष्यमान खुराना

- Advertisment -