शाहरुख आमिर रणबीरच्या पार्टीत

ranbir kapoor party

बुधवारी रात्री रणबीर कपूरने आपल्या घरी एका पार्टीचं आयोजन केले होते. त्यात शाहरुख आणि आमिर खान हे दोघे बडे स्टार एकत्र दिसले. या पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक जोड्याही आल्या होत्या. दिपिका पादुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंह हेसुद्धा या पार्टीत होते. काही वर्षापूर्वी रणबीर कपूर आणि दिपिकाचं नावं जोडलं जात होतं. त्यानंतर तिचं नाव रणबीर सिंहशी जोडलं गेलं. पण या वावड्या बॉलिवूडमध्ये उडत असतात. त्यांना ही मंडळी गांभीर्याने घेत नाहीत. आता या निमित्ताने ही मंडळी बड्या स्टार्ससोबत खासकरून शाहरुख आणि आमिरसोबत पार्टीत एन्जॉय करत होती. या सगळ्यांच्या एकत्र फोटो हा बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तर आलिया आणि रणबीर आगामी ब्रह्मास्त्रच्या शुटींगमध्ये बिझी आहेत.