स्मृती इराणींच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला किंग खान

अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाला किंग खान म्हणजेच शाहरुख खान यानेसुद्धा हजेरी लावल्याचा फोटो अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत.

Shahrukh Khan arrives at Smriti Irani's daughter's wedding reception

अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शानेल इराणी हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाला किंग खान म्हणजेच शाहरुख खान यानेसुद्धा हजेरी लावल्याचा फोटो अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला शेअर केले आहेत.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची कन्या शनैल इराणी हिने काही दिवसांपूर्वी अर्जुन भल्लाशी लग्न केले. शनैल आणि अर्जुनने राजस्थानमधील जोधपूर शहरातील एका सुंदर किल्ल्यावर लग्नगाठ बांधली. या लग्न सोहळ्याचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. नुकतेच या जोडप्याच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्स यांनी हजेरी लावली होती. शनैल आणि अर्जुनच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खान हा देखील नवीन जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी आला होता.

स्मृती इराणी आणि झुबिन इराणी यांच्या मुलीच्या लग्नाचे रिसेप्शनही राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीत अनेक बाॅलिवूडचे अभिनेते आणि अभिनेत्री पोहोचले होते. या लग्नाच्या सोहळ्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेता शाहरुख खान याची. मौनी राॅयने आपल्या इंस्टाग्रामला शेअर केलेल्या एका फोटोमध्ये शाहरुख खान दिसत आहे. त्यामुळे आता सगळीकडे याची चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा –ठाकरे गट म्हणतो, निधी वाटपात दुजाभाव; न्यायालयाने सरकारकडे मागितला खुलासा

अभिनेत्री मौनी रॉय हिने तिचा पती सुरज नांबियार यांच्यासोबत या रिसेप्शनला हजेरी लावली होती. यावेळी त्याठिकाणी शाहरुख खान देखील उपस्थित होता. मौनीने शाहरुख सोबतचा देखील एक फोरो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही शाहरुख खान, मौनी रॉय आणि सूरज नांबियारसोबत स्मृती इराणी आणि झुबिन इराणी सुद्धा दिसत आहेत. पण या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये इतर अनेक स्टार्स पोहोचले होते. याशिवाय या रिसेप्शनला रोनित रॉय आणि त्याची पत्नी, टीव्ही निर्माती एकता कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र हे सुद्धा आलेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)