घरमनोरंजनराष्ट्रीय पुरस्कार कधीच मिळाला नाही - शाहरूख खान

राष्ट्रीय पुरस्कार कधीच मिळाला नाही – शाहरूख खान

Subscribe

शाहरूख खान हा बॉलीवूडचा बादशाह म्हटला जातो. मात्र त्याला नक्की कसलं दुःख आहे? काय सलतंय शाहरूखच्या मनात?

सुपरस्टार शाहरूख खानला बॉलीवूडचा बादशाह म्हटलं जातं. त्याच्याकडे काहीच नाही असं नाही. पण तरीही शाहरूखला एक दुःख सलत आहे. आता नक्की काय सलतंय शाहरूखला असा नक्कीच प्रश्न सगळ्यांनाच पडेल. पण जरा थांबा. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये त्याला कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही आणि त्याचा कोणताही चित्रपट कोलकाता फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव (केआयएफएफ) मध्ये दाखवण्यात न आल्याचं त्याला दुःख झालं आहे. शनिवारी त्याच्या आगामी चित्रपट ‘झिरो’चा ट्रेलर मात्र केआयएफएफमध्ये दाखवण्यात आला होता. प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या शाहरूख खानला नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचवेळी शाहरूखने आपलं हे सलत असलेलं दुःख बोलून दाखवलं.

बौद्धिक विचारासाठी मला बोलावत नाहीत – शाहरूख

‘फिल्म महोत्सवामध्ये डान्स करायला किंवा लोकांच्या स्वागतासाठी चांगलं बोलण्यासाठी मला बोलावण्यात येतं मात्र, बौद्धिक विचारांसाठी मला बोलावण्यात येत नाही’ असंही शाहरूखनं यावेळी म्हटलं. ‘आतापर्यंत ७० चित्रपट केले असून मला फिल्म महोत्सवामध्ये केवळ नाचण्यासाठीच बोलावलं जातं किंवा कोणाबरोबर चांगलं बोलायचं असेल तर बोलावण्यात येतं. पण बौद्धिक कामासाठी मात्र कधीही बोलावण्यात येत नाही कारण मी तितका बुद्धिवान नाही आणि कदाचित मी हुशारही नाही’, अशी खंत यावेळी शाहरूखने बोलून दाखवली. इतकंच नाही तर पुढच्या १० वर्षात असा काळ येईल जेव्हा आपला चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचा भाग असेल अशी आशाही यावेळी शाहरूखने व्यक्त केली. तर आजपर्यंत आपल्याला कोणताही राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेला नाही असंही शाहरूखने यावेळी म्हटलं. हा एकमात्र पुरस्कार आहे जो केआयएफएफमध्ये मला ममता दी (पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री) यांनी प्रेमाने दिला आहे, त्यामुळे हा माझ्यासाठी खास आहे अशी भावना शाहरूखने यावेळी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -