आता OTT प्लॅटफॉर्मना टक्कर देण्यासाठी येतोय शाहरुखचा SRK Plus

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform ) जमाना आहे आणि या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना टक्कर देण्यासाठी शाहरुख (shahrukh khan) त्याचा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करत आहे.

shahrukh khan launching its own ott app srk plus
आता OTT प्लॅटफॉर्मना टक्कर देण्यासाठी येतोय शाहरुखचा SRK Plus

बॉलिवूडच्या किंग खानला (shahrukh khan ) स्क्रिनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखचा सिनेमा असो किंवा जाहिरात त्याची प्रत्येक कलाकृती चाहते मनापासून पाहतात. शाहरुख तब्बल चार वर्षांनी पठाण (Pathan )  सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. पठाण शाहरुखसाठी महत्त्वाचा आहेच परंतु त्याआधी शाहरुखने त्याच्या चाहत्यांना एक मोठं सप्राइज दिलं आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा (OTT Platform ) जमाना आहे आणि या सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना टक्कर देण्यासाठी शाहरुख त्याचा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. शाहरुखने नुकतीच त्याच्या सोशल मीडियावर SRK Plus या नव्या ओटीटी अँपची घोषणा केली आहे. (shahrukh khan launching its own ott app srk plus)

‘कुछ कुछ होने वाला हैं ओटीटी की दुनिया में’, असे म्हणत शाहरुखने स्वत:च्या फोटोसह SRK Plus अँपचा लोगो शेअर केला आहे.

शाहरुखच्या या पोस्टवर अभिनेता सलमान खानने देखील पोस्टर शेअर करत शाहरुखला शुभेच्छा दिल्यात. ‘आज की पार्टी तेरी तरफ से शाहरुख. SRK + या तुझ्या नव्या ओटीटी अँपसाठी तुला खूप शुभेच्छा’, असे सलमानने म्हटले.

शाहरुखच्या SRK + ची घोषणा झाल्यानंतर आता शाहरुखचे सगळे सिनेमे SRK + या अँपवरचा पाहायला मिळणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काहींनी तर शाहरुखच्या अँपच्या सब्स्क्रिप्शनवरुन मिम्स देखील व्हायरल केलेत. शाहरुखकडून मात्र नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

शाहरुख मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय दिसत आहे. पठाण सिनेमाच्या प्रमोशन निमित्त सोशल मीडियावर चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील देत आहे. एकंदरीतच शाहरुख डबल जोश आणि पॅशनने कमबॅक करत आहे. एकीकडे पठाण एक्शन मोडमध्ये आहे तर दुसरीकडे शाहरुख ओटीटी अँपचे नवीन सप्राइज सर्वांना दिले आहे.


हेही वाचा – आता OTT प्लॅटफॉर्मवर झळकणार ‘The Kashmir Files’