घरमनोरंजनआपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही शाहरुखची इच्छाच होती...

आपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही शाहरुखची इच्छाच होती…

Subscribe

बॉलिवूड बादशाह शाहरुख त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त विनोदी आणि परखड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. आपल्या अभिनयाने तो नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतो. बॉलिवूडमध्ये कुणी त्याला ‘किंग खान’ तर कुणी ‘डॉन’ नावाने संबोधतात. शाहरुखच्या करियरशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. शाहरुख अनेकदा आपल्या कुंटुंबियांसह वेळ घालवताना दिसतो. आपल्या मुलांसोबत फोटो शेअर करताना दिसतो. नेहमीच चित्रपटांसाठी चर्चेत असणारा शाहरुख आता मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील एका क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्स पार्टीतून आर्यनला एनसीबीने ताब्यात घेतले आहे. यावरून आता बॉलिवूडमध्ये उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

मात्र आपल्या मुलानं ड्रग्स घ्यावेत ही इच्छा यापूर्वी शाहरुखनेच बोलून दाखवली होती. यावरून आता शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे. शाहरुख खानने आपला मुलगा आर्यनबद्दल एका मुलाखतीत असे काही सांगितले होते की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. आर्यनला सर्व चुकीच्या गोष्टी करु शकतो ज्या मी तरुणपणात करू शकल्या नाहीत. असं शाहरुखने म्हटले होते.

- Advertisement -

१९९७ साली सिमी ग्रेवालच्या टॉक शोमधील शाहरुख खानने केलेली ही वक्तव्ये आता या प्रकरणामुळे पुन्हा व्हायरल होत आहेत. या टॉक शोमध्ये शाहरुखसह गौरीही दिसली होती. गौरीने तिचा पहिला मुलगा आर्यनला जन्म दिल्यानंतर खास सिमीने शाहरुख आणि गौरी यांच्याशी मुलाबद्दलही चर्चा केली होती.

यावेळी सिमी ग्रेवालने शाहरुखला त्याच्या मुलाविषयी विचारले की, तो आर्यनला कसा वाढवणार, ज्यावर शाहरुखने उत्तर दिले की, मला तरुण वयात ज्या चुकीच्या, अनैतिक गोष्टी करता आल्या नाहीत त्या सर्व माझ्या मुलाने जरुर कराव्यात. शाहरुखचे हे उत्तर अनेकांसाठी अनपेक्षित होते. यावर शाहरुख पुढे म्हणाला की, सोयी सुविधा नसल्यामुळे ज्या गोष्टी तरुपणात मला करता आल्या नाहीत. त्या सगळ्या माझ्या मुलाने कराव्यात अशी माझी इच्छा आहे. तो ३ ते ४ वर्षांचा झाल्यावरच आर्यनला काही गोष्टी करण्याची परवानगी असेल. त्याने खुशाल मुलींच्या मागे फिरावं, ड्रग्स घ्यावेत आणि सेक्ससुद्धा करावा, मला ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या आर्यनने लवकर सुरु केल्या तर उत्तम, असेही शाहरुख त्यावेळी म्हणाला होता.

- Advertisement -

एवढ्यावरचं तो थांबला नाही तर त्यांनी एक विचित्र इच्छा बोलून दाखवली होती. ती म्हणजे जेव्हा आर्यन शाहरुखसोबत त्याच्या मित्रमंडळींसह असेल, त्यावेळी त्यांच्या मुलींनी शाहरुखकडे येऊन आर्यनची तक्रार करायला हवी. शाहरुखच्या या वक्तव्यांची आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -