घरमनोरंजनAryan Khan: आर्यन खान करतोय या हिरोईनला डेट

Aryan Khan: आर्यन खान करतोय या हिरोईनला डेट

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आर्यन खानचं नाव आतापर्यंत अनन्या पांडे (Ananya Panday), शनाया कपूर (Shanaya Kapoor) या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. पण आता आर्यन खान परदेशी अभिनेत्री आणि मॉडेल लारिसा बोन्सीला (Larissa Bonesi) डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. फक्त चर्चाच नाही तर नेटकऱ्यांनी त्याबद्दलचे अनेक पुरावे देखील दिले आहेत. रेडीटवर काही नेटकऱ्यांनी त्यांचे एकत्रित फोटोही शेअर केले आहेत.

रेडिटवर एका यूजरने जुन्या म्यूझिक प्रोग्राममधील एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये आर्यन खान परदेशी मॉडेल लारिसा बोन्सीसोबत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवरुन अनेकांनी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच दोघांच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे देखील म्हटले जात आहे.

- Advertisement -

आर्यन किंवा लारिसाने दोघांच्या नात्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे खरच डेट करत आहेत की केवळ चर्चा सुरु आहेत याविषयी माहिती समोर आलेली नाही. आर्यन खानला त्याचे आयुष्य हे खासगी ठेवायला आवडते. तो कधीच माध्यमांशी संवाद साधताना दिसत नाही. तो कायमच प्रसिद्धी, फेम यापासून लांब असल्याचे पाहायला मिळते.

Screenshot 2024-04-01 1505

- Advertisement -

आर्यन खान लारिसाच्या संपूर्ण कुटुंबियांना फॉलो करतो. आर्यनने लारिसाच्या आईला वाढदिवशी खास भेट दिली होती. लारिसा परदेशातील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. लॅरिसा बोनेसी. पंजाबी गायक गुरू रंधावाच्या ‘सुरमा सुरमा’ सारख्या गाण्यांमध्ये ती दिसली होती. तिने टिस्का चोप्रा, बॉबी देओल, मौनी रॉय यांच्यासोबत ‘पेंटहाऊस’ मध्येही काम केलं आहे. 2016 मध्ये तेलगू भाषेतील ॲक्शन-कॉमेडी चित्रपट ‘थिक्का’ आणि 2018 मध्ये तेलुगू कॉमेडी चित्रपट ‘नेक्स्ट एन्टी?’ मध्येही ती दिसली होती.

काही दिवसांपूर्वी लारिसाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एक पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आर्यन खान देखील हजर असल्याचे म्हटले जात आहे. एका यूजरने या पार्टीमधील दोघांचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे लारिसा आणि आर्यनच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही परदेशी अभिनेत्री खरच शाहरुख खानची सून होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Larissa Bonesi (@larissabonesi)

 आर्यन खान सध्या ‘स्टारडम’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा तो सांभाळत आहे. आर्यन खानच्या या पहिल्या-वहिल्या वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘स्टारडम’च्या माध्यमातून लोकप्रियता मिळवण्याचा आर्यनचा प्रयत्न आहे. शाहरुख खान या सीरिजचा भाग असणार अशी चर्चा होती. पण आर्यनने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

_______________________________________________________

टॉप व्हिडिओज्

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -