आर्यनचा जामीन शाहरुख खानला वाटतोय कठीण, मन्नतवरील स्थिती मित्राकडून शेअर

shahrukh khan thinks aryan khan wont get bail today says friends
आर्यनचा जामीन शाहरुख खानला वाटतोय कठीण, मन्नतवरील स्थिती मित्राकडून शेअर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. आर्यनला जामीन मिळण्यासाठी शाहरुख खानने नवीन वकिलांची निवड केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी आज आर्यनची बाजू मांडणार आहेत. यांच्यासोबत ज्येष्ठ वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे कोर्टात उपस्थित राहिले आहेत. तर दुसरीकडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) आर्यन खानला जामीन न मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यादरम्यान शाहरुखच्या मन्नतमधील परिस्थिती काय आहे, याची माहिती खान कुटुंबियांच्या जवळील व्यक्तीने दिली आहे.

इंग्लिश वृत्तसंस्था इंडिया टुडेसोबत बातचित करताना खान कुटुंबियांचा जवळील व्यक्तीने सांगितले की, ‘आर्यन खानला आज बेल मिळणार नाही, असा विचार शाहरुख खान आणि गौरी खानसह कुटुंबातील लोकं विचार करत आहेत. कारण हे प्रकरण लांबणार आहे. आणखीन काही दिवस आर्यनच्या अडचणी वाढू शकतात असे दिसत आहे.’

दरम्यान आर्यन खान प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. क्रूझ पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने दावा केली आहे की, आर्यन खानची सुटका करण्यासाठी किरण गोसावीने आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडून केली होती. मात्र ही डील १८ कोटी रुपयांची झाली. यातील ८ कोटी समीर वानखेडेंना आणि उर्वरित इतरांमध्ये वाटू घेण्याचे ठरले. पण प्रभाकर साईल याने केलेल्या आरोप आणि प्रतिज्ञापत्राचा आर्यन खान प्रकरणाशी संबंध नसल्याचे आर्यनच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Shahrukh Khan जेव्हा दुःखी असतो, तेव्हा मन्नतच्या गच्चीवर जाऊन….