Aryan Khan Bail: मन्नतच्या बाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा जल्लोष, फटाके आणि पेढे वाटून साजरा केला आनंद

मुंबईतील अनेक दर्ग्यांमध्येसुद्धा आर्यनच्या सुटकेसाठी चाहत्यांनी चादरी चढवल्या

Shahrukh khan's Fans celebrated with firecrackers outside on mannat benglow after aryan khan's bail

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाल्याने शाहरुख खानच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खानला हायकोर्टाकडून जामीन देण्यात आल्यानंतर शाहरुखच्या निवासस्थानी मन्नत बाहेर त्याचा चाहत्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांचा एकच जल्लोष पहायला मिळत असून फटाके आणि पेढे वाटून चाहत्यांनी हा आनंद साजरा केला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नतबाहेर ‘वेलकम होम प्रिंस आर्यन’ असे पोस्टर देखील लावले आहेत. आर्यनच्या जामिनानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी आर्यनच्या स्वागताची जंगी तयारी केल्याचे पहायला मिळत आहेत. शाहरुखचे मुंबईतील अनेक चाहत्यांनी सध्या मन्नतबाहेर मोठी गर्दी केली असून ‘वेलकम आर्यन खान’, ‘लव्ह यू शाहरुख सर’ अशा घोषणा देताना चाहते दिसत आहेत. मन्नत बाहेर आलेल्या शाहरुखच्या चाहत्यांची गर्दी रोखण्यासाठी मन्नतबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यापासून शाहरुखचे लाखो चाहते त्याच्या पाठिशी उभे राहिले होते. आर्यनला अटक केली तेव्हा शाहरुख ‘पठाण’ सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. शाहरुख मुंबईत आला त्यावेळसही चाहते ‘वी सपोर्ट शाहरुख’ ‘वी सपोर्ट आर्यन खान’, असे पोस्टर घेऊन दाखल झाले होते. आर्यन खानच्या सुटकेची शाहरुखसह त्याचे चाहते वाट पाहत होते. मुंबईतील अनेक दर्ग्यांमध्येसुद्धा आर्यनच्या सुटकेसाठी चाहत्यांनी चादरी चढवल्या होत्या. मन्नत बाहेर अनेक चाहते शाहरुखचा फॅमिली फोटो घेऊन ‘लव्ह यू शाहरुख सर’ अशा घोषणा देत आहेत.

बॉम्बे हायकोर्टात सलग तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन देण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यनसह ८ लोकांना २ ऑक्टोबरला ताब्यात घेतले होते. त्यानंतर ८ ऑक्टोबरला आर्यनला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि आता तब्बल २७ दिवसांनी आर्यनची सुटका करण्यात आली आहे.


हेही वाचा – Aryan Khan Granted Bail:आर्यनची दिवाळी मन्नतवर, बापलेक एकत्र साजरा करणार वाढदिवस