पांढरे वस्त्र परिधान करून शाहरुखने मक्कामध्ये केलं उमराह

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नुकतंच सौदी अरेबियामधील आपल्या ‘डंकी’ चित्रपचटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याबाबत स्वतः शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. शूटिंग संपल्यानंतर शाहरुखने उमराह करण्यासाठी मक्का येथे पोहोचला. उमराह करतााचे शाहरुखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उमराह करताना शाहरुखने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. तसेच यावेळी त्याने चेहऱ्याला मास्क देखील घातला आहे. शाहरुखचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना पसंत येत आहे. त्याचे चाहते यावर अनेक कमेंटस् करत आहेत.

डंकी चित्रपटाचं शूटिंग झालं पूर्ण
दरम्यान, आता शाहरुख खान रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये जाणार आहे. जिथे तो भारतीय चित्रपटांना प्रमोट करेल. मागील काही दिवलांपूर्वी शाहरुखने त्याच्या डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झालं असल्याची घोषणा केली होती. तसेच पूर्ण टीम आणि कास्टचे देखील आभार मानतो. त्यावेळी तो म्हणतो की, या देशामध्ये शूट करायला खूप मज्जा आली.

दरम्यान, शाहरुखच्या या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत दिसेल. हा राजकुमार हिरानीचा चित्रपट आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती. शाहरुख आणि हिरानीची जोडीची हा पहिला चित्रपट आहे.

‘पठाण’ आणि ‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख
शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पठाण’ चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असतील तर, ‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असेल.

 


हेही वाचा :

करण जोहरच्या बायोपिकमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका