बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या त्याच्या आगामी जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाआधी शाहरुख त्याच्या पठाण चित्रपटामुळे देखील प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटाने जगभरात करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, आता शाहरुखचा जवान देखील नवा इतिहास रचन्यासाठी सज्ज झाला आहे.
‘जवान’ जगातील सर्वात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार
ये तो शुरुआत है…. The Many Faces of Justice… ये तीर
है… अभी ढाल बाक़ी है.. . ये अंत है अभी काल बाक़ी है …ये पूछता है ख़ुद से कुछ….अभी जवाब बाक़ी है…#Jawan releasing worldwide on 7th September 2023, in Hindi, Tamil & Telugu. pic.twitter.com/NSZdZtSHoe— Shah Rukh Khan (@iamsrk) August 25, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ‘जवान’ चित्रपटाला जगातील सर्वात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. ‘जवान’ जर्मनीतील लिओनबर्ग येथे आयमॅक्स स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. ही स्क्रीन 125 फूट रुंद आणि 72 फूट लांब आहे. जी जगातील सर्वात मोठी स्क्रीन मानली जाते. जी नेहमीच्या स्क्रीनपेक्षा खूप मोठी असून या स्क्रीनला ‘ट्रम्पलास्ट’ असे नाव देण्यात आले आहे. जे 6 डिसेंबर 2022 रोजी स्थापित केले गेले. या स्क्रीनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवले गेले आहे. या भव्य स्क्रीनवर प्रदर्शित होणारा जवान हा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे.
‘जवान’मध्ये शाहरुख-नयनताराची केमिस्ट्री
या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा देखील शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून नयनताराचा हा पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात शाहरुख-नयनताराची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटातून शाहरुख देखील पहिल्यांदाच दिग्दर्शक एटली कुमारसोबत काम करत आहे.