शाहरुखच्या ‘पठाण’ने ‘बाहुबली 2’ ला देखील टाकलं मागे; रचला नवा इतिहास

बॉलिवूडचा किंग खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. ‘पठाण’ प्रदर्शित होऊन 38 दिवस पूर्ण झाले असून अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. भारतीय बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत या चित्रपटाने 640 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 1026 कोटींचा आकडा पार केला आहे.

‘बाहुबली 2’ ला देखील टाकलं मागे

शाहरुखने 4 वर्षानंतर दमदार एन्ट्री करत भारतातील अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. लोकप्रिय ‘बाहुबली 2’ चित्रपटाला देखील शाहरुखच्या ‘पठाण’ने मागे टाकलं आहे. ‘पठाण’ने शुक्रवारी 1.20 कोटींची कमाई केली होती. तर आत्तापर्यंत या चित्रपटाने 640 कोटींची कमाई केली आहे. ‘बाहुबली 2’ने हिंदी बॉक्स ऑफिसवर 510 कोटी कमावले होते. ‘केजीएक 2’ हिंदी बॉक्स ऑफिसवर 435.33 कोटी आणि ‘दंगल’ चित्रपटाने 374. 43 कोटी कमावले होते.

पठाणमुळे ‘सेल्फी’ आणि ‘शहजादा’ फ्लॉप

अक्षय कुमारच्या चित्रपटांसाठी 2022 फारसं चांगलं गेलं नाही. अशातच आता 2023 ची सुरुवात देखील अक्षयसाठी वाईट ठरली आहे. 24 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीचा सेल्फी चित्रपटाने आत्तापर्यंत केवळ 13.70 कोटी कमावले आहेत. तसेच कार्तिक आर्यन आणि कृती सेननच्या ‘शहजादा’ चित्रपटाने आत्तापर्यंत 30.67 कोटी कमावले आहेत.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. भारतासोबतच परदेशात देखील चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला होता.

 


हेही वाचा :

ऋतिक रोशन-सबा आजाद अडकणार विवाहबंधनात?