काश्मिरमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ने तोडला 32 वर्षांचा रेकॉर्ड; चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ बुधवारी (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकडून विरोध केला जात होता. दरम्यान, आता पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ 2’ सारख्या चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

‘पठाण’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 55 कोटी कमावले असून संपूर्ण देशभरात हाऊसफुल झाला आहे. अनेक चित्रपटगृहांबाहेर ‘पठाण’ हाऊलफुल झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच परदेशात देखील रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली आहे. सर्वात खास गोष्ट अशी की, काश्मिरमध्ये देखील ‘पठाण’ हाऊसफुल झाला आहे. काश्मिरमधील चित्रपटगृहांबाहेर जवळपास 32 वर्षांनंतर कुठलातरी चित्रपट हाऊसफुल झाला आहे. काश्मिरी प्रेक्षक देखील शाहरुखचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; म्हणाले, हृदयविकाराचा झटका…