Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन बांग्लादेशातही 'पठाण'चा डंका; चित्रपटगृहातील व्हिडीओ व्हायरल

बांग्लादेशातही ‘पठाण’चा डंका; चित्रपटगृहातील व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशातही चांगली कमाई केली. अशातच हा बहुचर्चित चित्रपट बांगलादेशातही प्रदर्शित झाला असून या देशातील प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. बांग्लादेशातील चित्रपटगृहामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लोक ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

बांग्लादेशातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नुकत्याच काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा पठाण चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या देशातील प्रेक्षक चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. बांग्लादेशातील चित्रपटगृहामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लोक ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. तसेच काहीजण शाहरुखच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडियावर अनेकजण कमेंट्स देखील करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने जगभरात 1000 करोडपेक्षा अधिक कमाई केली होती . तर भारतीय बॉक्स ऑफिसवर 500 करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणने मुख्य भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :

इशिता दत्ताने शेअर केले बेबी बंपचे फोटो

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -