घरमनोरंजनशाहरुखच्या ‘पठाण’चा जगभरात डंका; 8 व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

शाहरुखच्या ‘पठाण’चा जगभरात डंका; 8 व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ 25 जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. 8 दिवसात चित्रपटाने करोडोंची कमाई केली असून भारतातील अनेक चित्रपटांना मात देत कमी काळात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 52.20 करोडोंची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले असून तिसऱ्या दिवशी 34 कोटी कमावले आहेत. चौथ्या दिवशी या चित्रपटाने 51.50 कोटी तर पाचव्या दिवशी 58.50 कोटी कमावले. सहाव्या दिवशी 25 कोटी कमावले तर सातव्या दिवशी चित्रपटाने 22 कोटी कमावले आहेत. आठव्या दिवशी पठाणने 19.50 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 349.75 कोटी कमावले आहेत. जगभरातून या चित्रपटाने 600 कोटींचा टप्पा पार केला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने देखील लाखो तिकीटांची विक्री केली होती.

- Advertisement -

पाकिस्तानी प्रेक्षकांना ‘पठाण’ची भुरळ

परदेशातील इतर देशांसोबतच पाकिस्तानी प्रेक्षकांना देखील ‘पठाण’ चित्रपटाची भुरळ पडली आहे. मात्र, मागील चार वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 25 जानेवारी रोजी पाकिस्तान सोडून इतर अनेक देशांमध्ये ‘पठाण’ प्रदर्शित झाला. परंतु तरीही ‘पठाण’ पाकिस्तानमधील कराची येथे चोरुन दाखवला जात आहे. त्यासाठी प्रेक्षक 900 रुपयांचे एक तिकिट खरेदी करण्यासाठी देखील तयार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये यूके बेस्ड असलेल्या फायरवर्क इवेंट्स कंपनीने फेसबुक पोस्ट करुन ‘पठाण’च्या चित्रीकरणाची माहिती दिली होती. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी 900 रुपये देऊन तिकिटं बुक केली.


हेही वाचा :

खायचे वांदे अन् बघताहेत 900 रुपयांची तिकीट काढून ‘पठाण’; नेटकऱ्यांकडून पाकिस्तान ट्रोल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -