शाहरुखचा मुलगा आर्यन खानने केलं ‘या’ वेब सीरिजचं लेखन

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता लवकरच मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान येत्या काळात एका वेब सीरीजमध्ये एक अभिनेता म्हणून नाही तर एक लेखक म्हणून पदार्पण करत आहे. शिवाय त्याच्या वेब सीरीजच्या कथेचं लिखाण आर्यनने पूर्ण केलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आर्यन खानच्या या सीरीजसाठी अभिनेत्याची निवड केली जात आहे. तसेच आर्यन स्वतः वेब सीरीजसाठी कास्टिंगची निवड करत आहे.

वर्षाच्या शेवटी सुरू होणार वेब सीरीज
आर्यनच्या मते सीरीजसाठी या सीरीजसाठी अश्या कलाकारांचा शोध घेतला जात आहे. जे भूमिकांमध्ये योग्य बसतील. यामुळेच आर्यन वेब सीरीजची कथा लिहिल्यानंतर कलाकारांची निवड देखील करत आहे. त्यामुळे शुटिंगची सुरुवात वर्षाच्या शेवटी सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शाहरुख खानने नुकत्याच एक मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, आर्यन खानला अभिनयामध्ये फारसा रस नाही. आर्यनला दिग्दर्शन आणि लेखनामध्ये काम करायला जास्त आवडतं. चित्रपट निर्माता बनण्यासाठी आर्यन मागील चार वर्षांपर्यंत प्रयत्न करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

आर्यन खानच्या या वेब सीरीजचा विषय चित्रपटसृष्टीशी जोडला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही सीरीज चित्रपट सृष्टीतील अनेक विविध गोष्टी दाखवणार आहे. या सीरीजमध्ये आर्यनसोबत बिलाल सिद्धीकी सुद्धा लेखक म्हणून जोडले गेले आहेत. बिलालने याआधी नेटफि्लक्स शो’बार्ड ऑफ ब्लड’ मध्ये लेखन केले आहे.


हेही वाचा :

‘डबल एक्सएल’ चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी मुख्य भूमिकेत