तारक मेहता यांची मालिकेतून एक्झिट, चाहत्यांना मोठा धक्का

अनेक दिवस शैलेश लोढा मालिकेचे चित्रीकरण करत नाहीत. एका महिन्यापूर्वीच त्यानी ही मालिका सोडल्याचे कळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे.

टी. व्ही. विश्वातली प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका संपूर्ण देशातल्याच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे मनोरंजन या मालिकेने आजपर्यंत केले आहे. ह्या मालिकेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत मिनी इंडियाचे एक रूप म्हणून या मालिकेची ओळख निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा सुद्धा घराघरात पोहोचल्या. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता या दोन मित्रांची जोडी सुद्धा घराघरात पोहोचली. मात्र तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता शैलेश लोढा याने मालिकेतून निरोप घेतला आहे. हे वृत्त समोर येताच प्रेक्षकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

अनेक दिवस शैलेश लोढा मालिकेचे चित्रीकरण करत नाहीत. एका महिन्यापूर्वीच त्यानी ही मालिका सोडल्याचे कळत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना आणि मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. दरम्यान या पूर्वी या मालिकेतील अनेक पात्रांनी मालिका सोडल्या आहेत. त्यांच्या जागी ती व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नवीन कलाकार मालिकेत दिसले. त्यात रोशन सिंग सोढी, अंजली, टप्पू, सोनू या व्यक्तिरेखांचा समावेश आहे. या मालिकेतील दया बेन  व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसुद्धा बऱ्याच काळापासून मालिकेत दिसत नाही.

शैलेश लोढा यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडला आहे. तसेच मालिकेच्या करारामुळे ते नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना अनेक प्रकल्पही सोडावे लागले आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांना मिळालेली दुसरी संधी गमवायची नाही. त्यामुळे  शो मधून बाहेर पडलो असे शैलेश लोढा यांनी सांगितले.  शैलेश लोढा याने तारक मेहता हे रंजक पात्र मालिकेत साकारून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. दरम्यान, शैलेश लोढा आणि दिलीप जोशी यांच्यात काही कारणास्तव वाद आहेत आणि म्हणून मालिका सोडली असे सुद्धा बोलले जात होते.  पण त्यावर शैलेश लोढा यांनी आमच्यात कोणत्या प्रकारचा वाद नाही आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत असे सांगितले. त्याचप्रमाणे ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन सुद्धा आम्ही खूप चांगले मित्र आहोत, असेही त्यांनी सांगितले.

शैलेश लोढा अभिनेत्यासोबतच लेखक आणि कवी सुद्धा आहे आणि त्याचा तो अंदाज आपल्याला मालिकेत सुद्धा पाहायला मिळाला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळावी त्यातलच एक नाव शैलेश लोढा. आणि त्यांचा चाहता वर्ग सुद्धा मोठा आहे. आता मालिकेतून घेतलेल्या या exit मुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी दिसत आहे.