घरमनोरंजनलता मंगेशकरांमुळे शक्ती कपूर यांच्या चुका माफ, अभिनेत्याने मंगेशकर कुटुंबासोबतच्या नात्याचा सांगितला...

लता मंगेशकरांमुळे शक्ती कपूर यांच्या चुका माफ, अभिनेत्याने मंगेशकर कुटुंबासोबतच्या नात्याचा सांगितला ‘किस्सा’

Subscribe

शक्ती कपूर यांच्या पत्नी शिवांगी कोल्हापूरे यांचे लता मंगेशकर यांच्या कुटुंबोसोबत वेगळे नाते

भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आठवड्याभरापूर्वी निधन झाले. मात्र त्यांच्यासोबतच्या आठवणींना आजही चाहत्यांकडून उजाळा दिला जात आहे. मात्र लता मंगेशकर यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनाच माहीत आहे. लता मंगेशकर यांचे जावई शक्ती कपूर यांच्यासोबतचे अनेक किस्से आजही सांगितले जातात. याच किस्स्यांना स्वत: शक्ती कपूर यांनी उजाळा दिला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक अशी ओळख असलेले शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापूरे या लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत. शिवांगी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापूरे लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. एका मुलाखतीमध्ये शक्ती कपूर यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या नात्याचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, “शिवांगी यांचे कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हतं, त्यामुळे त्यांनी पळू्न जाऊन लग्न केलं होतं,”

- Advertisement -

शक्ती कपूर पुढे म्हणाले की, “जेव्हा माझे वडील सिकंदर लाल कपूर यांना याबद्दल समजले तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. माझ्या आईने शिवांगीला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा माझे वडील शिवांगीला भेटले, जी माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान आहे, तेव्हा तिला पाहून ते खूश झाले आणि आनंदात म्हणाले की, खूप छान मुलगी आहे.”

“यावेळी शिवांगीने एका गाण्याच्या काही ओळी गायल्या, तेव्हा माझे वडील उभे राहून म्हणाले, ही इतकं छान कसं गाते? तेव्हा मी त्यांना सांगितल की, लता जी आणि शिवांगी एकाचं कुटुंबातील आहेत. तेव्हा ते म्हणाले, तुझ्या सगळ्या चूका माफ कारण तू इतक्या मोठ्या कुटुंबाशी नातं जोडलं. त्यानंतर वडीलांनी शिवांगीकडून लताजींची गाणी ऐकली आणि म्हणाले की, मी लताजींचा खूप मोठा चाहता आहे. शिवांगीकडून लताजींची गाणी ऐकल्यानंतर माझे वडील भावूक झाले,” असंही शक्ती कपूर म्हणाले.

- Advertisement -

शक्ती कपूर यावर पुढे सांगतात की, “मला वाटतं की माझी मुलगी श्रध्दासुध्दा एक चांगली गायिका आहे कारण ते तिच्या अंशात आहे. मला आठवतयं मी जेव्हा दिल्लीमध्ये होतो. तेव्हा श्रध्दाने मला फोन करुन सांगितलं, बापू मी एक गाणं रेकॅार्ड केले आहे. मी तिला म्हणालो, तू माझी चेष्टा तर करत नाहीस ना? तेव्हा तिने मला ते गाणं ऐकवलं. तिने गाण्यासाठी कोणतेच प्रशिक्षण घेतले नाही, पण तरीही ती ८-९ चित्रपटांमध्ये गायली आहे. मी श्रद्धाला गोल्डन चाइल्ड म्हणतो. कारण ती अभिनय आणि गाण्याचं कोणतेही प्रशिक्षण न घेता दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करत आहे,” असही शक्ती कपूर यांनी सांगितले.


दिपीका आणि इंद्राकडून Valentine’s day च्या खास शुभेच्छा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -