बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाची पन्नाशी ओलांडल्या तरीही अजूनपण अतिशय सुंदर दिसतात. अनेकदा चाहत्यांना त्यांच्या ब्युटी टिप्स जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका सौंदर्याविषयी सांगणार आहोत, जिने वयाच्या 49 वर्षे ओलांडली तरीही ती आताच्या नवोदित अभिनेत्रींनाही मागे टाकते.
बॉलिवूडचा एक नवीन चेहरा बनलेली आणि सेलिब्रिटींची खास मैत्रिण असलेली अभिनेत्री ती म्हणजे शालिनी पासी. शालिनी तिच्या संपत्तीसाठी ओळखली जाते. भारतातील श्रीमंत उद्योगपतीची पत्नी म्हणूनही शालिनीला ओळखलं जातं. शालिनी पासीला ‘फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’मध्ये प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. याठिकाणी तिने तिचे प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आणि ब्युटीबद्दल सांगितले. या शोदरम्यान शालिनीने दावा केला होता की ती दुधाने आंघोळ करते, ज्याबद्दल नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. की ती खरोखर दुधाने आंघोळ करते का?
View this post on Instagram
शालिनीने याचे उत्तर देताना सांगितले, ‘मी दुधाने आंघोळ करत नाही. मला शोमध्ये काहीही स्पष्ट करायचे नव्हते. म्हणूनच ते जे काही विचारतील त्याला ‘हो’ उत्तर द्यायची. आमच्या भागात गाई, घोडे किंवा बकरी पाळण्यास मनाई आहे, त्यामुळे दुधाने आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असं म्हणतं तिने रोज दुधाने अंघोळ करत असल्याची चर्चा ही केवळ अफवाच असल्याचं म्हटलं आहे. शालिनीच्या मते तजेलदार आणि निरोगी त्वचेसाठी घरगुती उपचारच उत्तम आहेत. घरगुती उपायांनीच ती त्वचेची काळजी घेते, रोज बीटरूट स्मूदी पिते असे देखील ती म्हणाली.
बिटामुळे त्वेचला नैसर्गिक चमक येते असे तिचे म्हणणं आहे. याआधी शालिनी एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘माझा नेहमी निसर्ग आणि साधेपणावर विश्वास आहे. माझ्या आई आणि आजीने मला स्वयंपाकघरातील वस्तूंपासून उपाय करायला शिकवले आणि मी ते माझ्या आयुष्यात स्वीकारायला सुरुवात केली.