Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Big boss मध्ये शमिता शेट्टीची एन्ट्री?

Big boss मध्ये शमिता शेट्टीची एन्ट्री?

शमितासोबतच अभिनेत्री मलाइका शेरावत हिला देखील बिग बॉससाठी विचारणा झाल्याचे कळतय.

Related Story

- Advertisement -

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ८ ऑगस्ट पासून बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग बॉसचा हा सीजन सर्वात वेगळा आणि क्रेझी असल्याचे म्हटले जात आहे. सिंगर नेहा भसीन हिचे नाव बिग बॉस ओटीटीसाठी कंन्फर्म करण्यात आल्याने आता बिग बॉसच्या घरात आणखी कोणत्या स्पर्धकांची एंट्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरे बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shipla Shetty) बहिण शमिता शेट्टी (Shamita Shetty) हिची बिग बॉसच्या घरात एंट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बिग बॉस ओटीटीसाठी शमिता शेट्टीला विचारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शमिता शेट्टी बिग बॉसमध्ये येण्याची शक्यता आहे. (Shamita Shetty entry in Bigg Boss?)

सध्या राज कुंद्रा प्रकरणामुळे शमिता शेट्टी त्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे शमिता बिग बॉस ओटीटीमध्ये असणार की नाही यावर अद्याप कोणतीही ऑफिशिअल माहिती देण्यात आलेली नाही. शमितासोबतच अभिनेत्री मलाइका शेरावत हिला देखील बिग बॉससाठी विचारणा झाल्याचे कळतय. मात्र मलाइका विषयी कोणतीही ऑफिशिअल माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात नेमक्या कोणत्या सदस्यांची एंट्री होणार यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

- Advertisement -

शमिताने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमात काम केले आहे. त्याचप्रमाणे अनेक मालिकांमध्ये देखील शमिका झळकली होती. इकल दिखला जा आणि खतरो के खिलाडीमध्ये देखील शमिता स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

- Advertisement -

बिग बॉस ओटीटी निर्माता करण जोहर होस्ट करणार आहे. सध्या करण देखील या शोच प्रमोशन करताना दिसतोय. नुकताच त्याने शोचा प्रोमो देखील शेअर केला होता. बिग बॉसमध्ये यावेळी नवीन आयडिया पहायला मिळणार असल्याचे या प्रोमोतून दिसून आले आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना कशाप्रकारचे टास्क देण्यात येणार आहेत. स्पर्धकांना शिक्षा आता बिग बॉस नाही तर प्रेक्षक देणार असल्याचे करण सांगितले. बिग बॉस खरंच क्रेझी असणार आहे मी याची जास्त वाट पाहू शकत नाही असे म्हणत करणने बिग बॉस ओटीटीचा प्रोमो शेअर केला.


हेही वाचा – Kishore Kumar Birthday : किशोर कुमार यांनी मधुबालाशी विवाह करण्यासाठी स्वीकारला इस्लाम धर्म, ४ लग्नांमुळे राहिले चर्चेत

 

- Advertisement -