Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन शनाया कपूरने ह्या डान्स्दरम्यान घेतला नव्हता ६० सेकंदापर्यंत श्वास, पाहा व्हिडिओ

शनाया कपूरने ह्या डान्स्दरम्यान घेतला नव्हता ६० सेकंदापर्यंत श्वास, पाहा व्हिडिओ

शनाया कपूरने तिच्या इंन्स्टाग्रामवर बेली डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ह्या व्हिडिओमध्ये तिने शकीराच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर ही सोशल मिडियावर बरीच अॅक्टीव्ह असते. शनाया नेहमी तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. अलीकडेच शनाया तिच्या एका डान्स व्हिडिओसाठी बरीच चर्चेत आली आहे. त्यामध्ये ती शकीराच्या गाण्यावर बेली डान्स करताना दिसत आहे.

- Advertisement -

शनायाने ह्यापूर्वी ही एक डान्स व्हिडिओ शेअर केला होता. पण तिच्या आताच्या बेली डान्स व्हिडिओमधील खास गोष्ट म्हणजे शनायाने एकूण 60 सेकंद डान्स करताना श्वास घेतला नाही आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या इंन्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. फक्त चार तासातच १,८०,०९२ पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ह्या डान्स व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ‘माझ्या या बेली डान्स व्हिडिओमध्ये मी 60 सेकंदांपर्यंत श्वास घेतला नाही. संजना मुथरेजा सोबत ड्रम एकल सादर करणे हा नेहमीच सर्वोत्कृष्ट काळ होता. ‘ असे ती व्हिडिओ शेअर करताना म्हणाली आहे.

- Advertisement -

शनाया कपूरचे इंन्सटाग्रामवर ३ लाखापेक्षा जास्त फॉलोअरस् आहेत. अलिकडेच शनायाने तिचे अकाऊंट पब्लिक केले आहे.

- Advertisement -