घरमनोरंजनसंजय कपूरच्या लेकीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

संजय कपूरच्या लेकीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Subscribe

बॉलिवूड स्टारकिड असलेल्या शनाया कपूरने निर्मात करण जोहर याच्या 'धर्मा कॉर्नरस्टोन एजेन्सी' सोबत तिच्या बॉलवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय कपूर याची लेक शनाया कपूर सिनेसृष्टीत आपली झलक दाखवायला तयार झाली आहे. बॉलिवूड मध्ये ती लवकरच पदार्पण करणार आहे. शनायाने ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजेन्सी’मध्ये प्रवेश घेतला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनसोबत ती पहिला चित्रपट करणार आहे. याबाबतची माहिती स्वत: करण जोहरने सोशल मीडियाद्वारे दिली होती. करण जोहरने शनायाच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले. यात ”शनाया कपूरचे #DCASquad मध्ये स्वागत.. या जुलैमध्ये शनायाचा पहिला चित्रपटासोबत एक अद्भुत आणि अविस्मरणीय प्रवास सुरु होईल.” अशी पोस्ट करण जोहरने केली आहे. त्यामुळे यावरुन शनाया लवकरच तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

शनायानेदेखील तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत, ”आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली. ‘धर्मा कॉर्नरस्टोन एजेन्सी’च्या कुटुंबासोबत एका नव्या प्रवासाची सुरुवात. माझ्या पहिल्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. हा जुलै महिना धर्मा प्रोडक्शनसोबत #DCASquad अशी कॅप्शन तिने या पोस्ट ला दिली आहे.

 शनायाने तिच्या कारकिर्दिची सुरुवात सहाय्यक म्हणूक केली होती. तिची बहीण जान्हवी कपूर हिच्या गुंजन सक्सेना या चित्रपटात तीने सहाय्यक म्हणून काम केले होते. शनाया बॉलिवूडमध्ये येण्याआधीच खूप प्रसिद्द होती. इन्स्टाग्रामवर तिचे ४ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आता ती कोणत्या नवीन चित्रपटात दिसणार आहे ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -

हे वाचा-  शनायाची आकाशात नवी झेप, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -