Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन शंकर महादेवन यांच्या बायोग्राफी सिनेमाने पटकावला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार

शंकर महादेवन यांच्या बायोग्राफी सिनेमाने पटकावला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार

माहितीपटाद्वारे शंकर महादेवन यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उलगडा करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन (shankar mahadevan)यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या गायन कलेनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. शंकर महादेवन यांनी गायलेली प्रत्येक गाणी हिट ठरली आहेत. शंकर, एहसान, लॉय या तिघांनी हिंदी सिनेसृष्टीत एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. शंकर महादेवन यांचा गायनाचा प्रवास हा अत्यंत मोठा आणि प्रेरणादायक ठरला आहे. आता त्यांनी गायलेल्या अनेक विविध भाषांमधला गाण्यांचा प्रवास पाहता त्यांच्यावर एका माहितीपट तयार करण्यात आला आहे. आणि याच माहितीपटाला टोरांटो इंटरनॅशनल वुमन्स फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपट या पुस्काराने गौरवण्यात आलं आहे.(Shankar Mahadevan’s Biography Cinema won the Best Documentary Award)गायक शंकर महादेवन यांच्या जिवनावर आधारीत एक बायोग्राफी बनली आहे. या बायोग्राफीद्वारे शंकर महादेवन यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा उलगडा करण्यात आला आहे. तसेच त्यांचे संपुर्ण आयुष्य पडद्यावर दाखवण्यात आलं आहे.

- Advertisement -

‘डिकोडिंग शंकर’ असं या माहीतीपटाचं नाव असून या माहितीपटाला दिप्ती सिवन यांनी दिग्दर्शीत केलं आहे. या माहितीपटाला टोरांटो वुमन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये डॉक्युमेंटरी सेगमेंटमध्ये बेस्ट फिल्मचा मानचा किताब मीळाला आहे. शंकर महादेवन यांनी एका मुलाखती दरम्यान हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त करत म्हणाले, “माझा बायोग्राफी सिनेमा कधी होईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण दिप्ती सिवन यांच्या दिग्दर्शनाखाली ती झाली. इतकंच नव्हे तर त्याला पारितोषिकही मिळालं. ही बायोग्राफी पाहताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या आयुष्यात गाण्यामुळे, संगीतामुळे मला पैसे मिळाले आहेतच. पण माझ्या गुडविलमुळेही मला अर्थप्राप्ती झाली. इतकंच नव्हे तर त्यामुळेच मी या लॉकडाऊन काळात काम करू शकलो. ”हे हि वाचा – रणबीर-आलिया लग्नानंतर ‘या’ साली घेणार घटस्फोट; KRKची भविष्यवाणी- Advertisement -

 

- Advertisement -