Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी शरद पवारांनी हिंदुजा रुग्णालयात घेतली दिलीप कुमार यांची भेट, तब्येतीची विचारपुस

शरद पवारांनी हिंदुजा रुग्णालयात घेतली दिलीप कुमार यांची भेट, तब्येतीची विचारपुस

दिलीप कुमार यांची तब्येत लवकरात लवक बरी व्हावी अशी शरद पवार यांची प्रार्थना

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस केली आहे. तसेच शरद पवार यांनी उपाचारांची आणि तब्येतीची विचारणा केली आहे. दिलीप कुमार यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शरद पवार यांनी रुग्णालयात दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांची भेट घेऊन उपचाराबाबत माहिती घेतली आहे. याबाबत शरद पवार यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली आहे. याबाबत शरद पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारपुस आणि उपाचाराची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्याकडून घेतली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच दिलीप कुमार यांची तब्येत लवकरात लवक बरी व्हावी अशी प्रार्थना देखील शरद पवार यांनी केली आहे.

- Advertisement -

अभिनेते दिलीप कुमार यांच्या सहाय्यकाने त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली आहे. दिलीप कुमार यांना नॉन-कोविड रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून अहवालाला थोडा वेळ जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत होता. डॉ.नितिन गोखले यांच्या निगरानीखाली कुमार यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली होती.

दिलीप कुमार यांच्या चाहत्यांकडून त्यांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. मागील वर्षी कोरोनामुळे दिलीप कुमार यांचे छोटे भाऊ अस्लम खाल आणि एहसान खान यांचे निधन झाले आहे. दिलीप कुमार यांचे वय ९८ वर्षे असून त्यांना मागिल महिन्यातही रुग्णालया दाखल करण्यात आले होते. परंतु २ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -