घरमनोरंजनकर्करोगाशी झुंज दिल्यानंतर शरद पोंक्षे पुन्हा रंगभूमीवर

कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर शरद पोंक्षे पुन्हा रंगभूमीवर

Subscribe

‘हिमालयाची सावली’ या नाटकातून शरद पोंक्षे पुनरागमन करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर ते पुन्हा एकदा नव्या दमाने अभिनयासाठी सज्ज झाले आहेत. या निमित्ताने किशोर यांनी पोस्ट लिहिली आहे.

प्रिय शरद !!!शरद तुझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे .. तू एक अत्युत्तम अभिनेता आहेस असं माझं मत आहे …… तुझ्या…

Kishor Saumitra Saumitra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜುಲೈ 16, 2019

- Advertisement -

‘तुझ्या अभिनयातली व्होकॅब्युलरी तू कशी कुठून आत्मसात केली आहेस माहित नाही पण तू जी वाक्य बोलतोस ती सत्याच्या जवळ जाणारीच वाटतात. भूमिकेचा तू जो सारासार विचार करतोस तो एखाद्या प्रगल्भ अभिनेत्याचा असतो. तुझा आवाज उत्तम आहेच पण त्याचा वापर तू जसा करतोस त्यावरून तुला तुझा आवाज कळला आहे हे कळतं. काही नटांना आयुष्यभर काम करून स्वतःचा आवाजच गवसत नाही. तू ‘हिमालयाची सावली’ करतो आहेस हे तुझ्या डेडिकेशनचं फळ आहे. तू ‘तू’ आहेस हेही प्रेमात पडण्यासारखंच आहे,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

सहा महिने घेतलेल्या औषधोपचार आणि किमोथेरेपीमुळे या आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी शरद पोंक्षे सज्ज झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -