रात्री साडेनऊ वाजता सुरु झालेला प्रयोग पहाटेपर्यंत सुरू होता, शरद पोंक्षेंनी सांगितला मी नथुराम गोडसे नाटकाचा प्रसंग

शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोयmi nathuram godase boltoy हे नाटक सुद्धा गाजलं होतं. या नाटकातली शरद पोंक्षे यांची भूमिका सुद्धा विशेष उल्लेखनीय होती. याच नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक प्रसंग शरद पोंक्षे यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट या तीनही क्षेत्रांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने सर्वच रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे मराठी अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe). उत्तम अभिनय शैली आणि ओघवती भाषा यामुळे शरद पोंक्षे यांची एक वेगळी ओळख सुद्धा आहे. शरद पोंक्षे यांच्या प्रत्येक भूमिका या नेहमीच सदाबहार असतात. काही वेळा गंभीर तर काही वेळा विनोदी भूमिकांनी शरद पोंक्षेनी प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. शरद पोंक्षे यांचं मी नथुराम गोडसे बोलतोय (mi nathuram godase boltoy) हे नाटक सुद्धा गाजलं होतं. या नाटकातील शरद पोंक्षे यांची भूमिका सुद्धा विशेष उल्लेखनीय होती. याच नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक प्रसंग शरद पोंक्षे यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता.

मी नथुराम गोडसे बोलतोय (mi nathuram godase bolatoy) या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान जो किस्सा घडला होता त्या बद्दल शरद पोंक्षे म्हणाले की, हा किस्सा चंद्रपूर येथे घडला होता. रात्री ९. ३० वाजता या नाटकाचा प्रयोग होता. आणि त्या प्रयोगासाठी खूप लांबून प्रक्षक आले होते आणि या भागात नाटकांचे जास्त प्रयोग होत नसल्याने अनेक जण हे आपल्या संपूर्ण कुटुंब समवेत आले होते. साधारण अडीच तासात संपणारं नाटक त्यादिवशी पहाटे ६ वाजता संपलं. त्याचं कारण असं होतं की, चंद्रपूर मध्ये नाटकाचा प्रयोग सुरु झाला आणि प्रयोग सुरु असतानाच साधारण १५० जणांचा एक समूह प्रेक्षागृहात घुसला आणि त्यांनी नाटक थांबविण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी अचानक तोडफोड सुरु केली आणि हा सगळा प्रकार रात्री सुरु झाला तो पहाटे पर्यंत सुरु होता. पण एवढं सगळं होऊनही नाटक पाहण्यासाठी आलेला एकही प्रेक्षक प्रेक्षागृहातून बाहेर पडला नाही. पूर्ण वेळ आम्ही प्रेक्षकांच्या मदतीने या प्रसंगाचा सामना करत होतो. अखेर पहाटे ४. ३० वाजता हा सगळा प्रकार थांबला आणि प्रयोग व्यवस्थितपणे पुन्हा सुरु झाला. नाटकाबद्दल एवढे वाद सुरु असताना प्रेक्षकानै मात्र नाटकाकडे कधीच पाठ फिरवली नाही. यामध्ये प्रेक्षकांचंच प्रचंड कौतुक आहे. नाटकाच्या प्रयोगाचा असा एक वेगळा आणि भीतीदायक प्रसंग शरद पोंक्षेंनी सांगितला.

मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनच प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता. पण असं असलं तरीही या नाटकाला जेव्हडा उदंड प्रतिसाद मिळाला तेवढाच या नाटकाला विरोध सुद्धा करण्यात आला होता. पण प्रेक्षकांनी मात्र कायमच या नाटकाला पसंती देत नाटक हाऊसफुल केले. नथुराम गोडसे यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेणारे हे नाटक होते. काही ठिकाणी या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचे सुद्धा प्रयन्त करण्यात आले होते पण प्रेक्षकांनी मात्र नेहमीच या नाटकाला उत्तम प्रतिसाद दिला आणि प्रेक्षकांनी या नाटकाला जे प्रेम आणि जो प्रतिसाद दिला त्या संदर्भात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे (sharad ponkshe) नेहमीच प्रेक्षकांचे आभार मानतात.