KRK च्या कॉन्ट्रोव्हर्शिअल पुस्तकाचा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी केलं बिग बींना ट्रोल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात अनेक चाहते आहेत, अमिताभ बच्चन अलीकडे सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. नुकताच त्यांनी KRK (Kamaal R Khan) च्या कॉन्ट्रोव्हर्शिअल पुस्तकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते सांगताना दिसून येत आहेत की, त्यांचे एक कॉन्ट्रोवर्शियल पुस्तक लॉन्च होणार आहे.

अमिताभ बच्चनने केला व्हिडिओ शेअर

 खरंतर KRK के एक दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे. कोणताही नवा चित्रपट रिलीज झाला की, KRK त्या चित्रपटाचा रिव्यू करतात. KRK वर पुस्तक लिहिले गेले आहे, जे रणबीर पुष्प ने लिहिलं आहे. या पुस्तकाचे नाव ‘बायोग्राफी ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल केआरके.’ असं आहे.

अमिताभ ने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच चाहते त्यांना अनेक उलट-सुलट प्रश्न विचारू लागले आहेत. त्यातील एकाने लिहिलंय की, “सर तुम्ही मस्करी करत आहात का?” दुसऱ्याने लिहिलं की, “सर तुम्ही कधीपासून अशा लोकांचे व्हिडिओ शेअर करू लागला? प्लीज तुम्ही असं काही केल्याने स्वताःला खाली आणत आहात.” तिसऱ्याने लिहिलंय की, “सर गुटका विकाताना पण जेवढं पाप लागणार नाही, तेवढं पाप आता लागेल.” हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अमिताभ बच्चन पुन्हा ट्रोल होत आहेत.

अमिताभ आता लवकरच ‘रनवे 34’ मध्ये दिसून येणार आहे. शिवाय आलिया आणि रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात दिसून येणार आहेत. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :‘Kabhi Eid Kabhi Diwali’ चित्रपटामध्ये ‘या’ साउथ सुपरस्टारची एन्ट्री