लीना मणिमेकलईने केला नवा फोटो शेअर; शिव-पार्वतीचा ‘तो’ फोटो पाहून युजर्स संतापले

लीना मणिमेकलईने केलेल्या या फोटोवर राजकीय क्षेत्रातूनही अनेक टिका केल्या जात आहेत. भाजपचे नेता शहजाद पूनावाला यांनी यावर विधान दिले आहे की, ही रचनात्मक अभिव्यक्तिची नसून, हे मुद्दाम लोकांना भडकवलं जात आहे

‘काली’ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरनंतर दिग्दर्शक लीना मणिमेकलईने आता पुन्हा एक नवीव ट्वीट शेअर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या आगीचा भडका उडालेला आहे. लीना मणिमेकलईने शेअर केलेल्या ट्वीटमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे लीना मणिमेकलईला सोशल मीडियावर अनेकजण ट्रोल केलं जात आहे.

लीना मणिमेकलईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये शिव-पार्वतीच्या वेशातील दोन व्यक्ति दिसत आहेत, जे हातामध्ये सिगारेट ओढताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत लीना मणिमेकलईने इतर काही…. हे असं लिहिलेलं आहे. या पोस्टवर युजर्स अनेक कमेंट करत आहेत, ज्यात एकाने लिहिलंय की, ती फक्त राग पसरवत आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, तिला आपल्या धर्माचा अपमान करणं बंद करायला हवं.

लीना मणिमेकलईने केलेल्या या फोटोवर राजकीय क्षेत्रातूनही अनेक टिका केल्या जात आहेत. भाजपचे नेता शहजाद पूनावाला यांनी यावर विधान दिले आहे की, ही रचनात्मक अभिव्यक्तिची नसून, हे मुद्दाम लोकांना भडकवलं जात आहे. हिंदूंना शिवीगाळ करणे म्हणजे धर्मनिरपेक्षता? हिंदूंच्या आस्थेचा अपमान म्हणजे उदारवाद?, तसेच त्यांनी पुढे लिहिले की, लीनाची हिंमत अजूनच वाढत आहे कारण, तिला माहित आहे की, विरोधी पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस तीला सपोर्ट करत आहे. आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसने देखील लीनाचं समर्थन करणाऱ्या महुआ मोइत्रावर काही अॅक्शन घेतलेली नाही.

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टवरून वादाला सुरूवात
या पोस्टर आधी लीना मणिमेकलईने काली चित्रपटाचं एक पोस्टर शेअर केलं होतं. त्या पोस्टरमध्ये काली मातेला सिगारेट ओढत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या वादानंतर लीना मणिमेकलईने तिच्या ट्वीट अकाउंटवरून हे पोस्टर काढून टाकले आहे.


हेही वाचा :बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ वर स्थगिती