तैमूर आणि जेहला चित्रपट पाहण्याची परवानगी नाही, आजी शर्मिला टागोरने सांगितले ‘कारण’

sharmila tagore reveals her grandkids taimur ali khan and jeh ali khan are not allowed to watch movies
शर्मिला टागोर

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. 11 वर्षांनी शर्मिला टागोर गुलमोहर या फॉमिली ड्रामा चित्रपटातून कमबॅक करणार आहे. शर्मिला टागोर यांनी एक काळ खूप गाजवला. दरम्यान एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांना जेव्हा त्यांच्या चित्रपटांवर नातवांची काय प्रतिक्रिया होती असे विचारण्यात आले. यावर शर्मिला टागोरने म्हणाल्या की, इनायाने एकदा खास मेसेजद्वारे त्यांचे अभिनंदन केले होते.

दरम्यान शर्मिला टागोर यांनी सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलांबद्दलही एक मोठा खुलासा केला आहे. शर्मिला
टागोर म्हणाल्या की, तैमूर आणि जेह या दोघांनाही माझे चित्रपट पाहण्याची परवानगी नाही. कारण तैमूर आणि जेहने जर मला ऑनस्क्रीन पाहिले तर त्या दोघांसाठी खूप कठीण जाईल. असं त्यांच मत आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान जेव्हा कधी शर्मिला टागोर यांचे चित्रपट पाहतात तेव्हा दोघेही Well Done इतकचं म्हणतात. कारण दोघांकडेही चित्रपट पाहिल्यानंतर बोलण्यासारखं काहीच नसतं. असंही त्या म्हणाल्या. शर्मिला यांच्या चित्रपटांवर मिळणारी ही प्रतिक्रिया या दोन पिढ्यांमधील अंतरामुळे असल्याचे म्हटले जातेय.

‘गुलमोहर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर शर्मिला टागोर व्यतिरिक्त या चित्रपटात मनोज बाजपेयी, अमोल पालेकर, सूरज शर्मा आणि सिमरन ऋषी बग्गा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गुलमोहर हा एक सर्वसमावेशक कौटुंबिक चित्रपट असून तो ऑगस्ट 2022 मध्ये थेट OTT वर प्रदर्शित होईल. शर्मिला टागोर शेवटच्या 2010 मध्ये आलेल्या ब्रेक के बाद या चित्रपटात दिसल्या होत्या. गुलमोहर चित्रपटाची कथा बत्रा कुटुंबाच्या अनेक पिढीभोवती फिरते. कुटुंब त्यांचे 34 वर्षांचे घर सोडण्यास तयार आहे.


आरआरआर, पंचायत 2, एस्केप लाइव्हसह अनेक web Series आणि Films चा ‘या’ आठवड्यात OTT वर धमाका