शर्मिला ठाकरे यांनादेखील ‘वेड’ची भुरळ; चित्रपट पाहण्यासाठी केलं अख्खं थिएटर बुक

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना रितेश आणि जिनिलीयाच्या चित्रपटाची भूरळ पडली आहे. याबाबत ते प्रेक्षकांचे आभार देखील मानत आहेत. अशातच त्यांनी दादर येथील प्लाझा चित्रपटगृहांत ‘वेड’ चित्रपटाच्या शोदरम्यान हजेरी लावली. यावेळी रितेश व जिनिलीयाने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिथे राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील उपस्थित होत्या. ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी शर्मिला ठाकरे यांनी प्लाझा थिएटर बूक केलं होतं.

शर्मिला ठाकरे यांना देखील ‘वेड’ची भूरळ
खरंतर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजकारणासोबतच मनोरंजनसृष्टीशी देखील जवळचा संबंध आहे. राज ठाकरे यांना चित्रपट पाहण्याची देखील खूप आवड आहे. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलया यांचा वेड चित्रपट प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. अशातच राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना देखील वेड चित्रपटाची भूरळ पडली आहे. त्यांनी रितेश देशमुख व जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक केल्याची बातमी समोर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

राज ठाकरेंप्रमाणेच शर्मिला ठाकरे यांना देखील चित्रपट पाहण्याची आवड आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांना दादर येखील प्लाझा थिएटरमधील संपूर्ण थिएटर बुक केलं. दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने 20 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.


हेही वाचा :

‘अवतार 2’ ने जगभरातून केला 14000 कोटींचा टप्पा पार; भारतातही रेकॉर्ड ब्रेक कमाई