HomeमनोरंजनShashank Ketkar : शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव वर्षात दिली गुडन्यूज

Shashank Ketkar : शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा होणार! नव वर्षात दिली गुडन्यूज

Subscribe

होणार सून मी ह्या घरची मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर याने नव्या वर्षात चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याने आपल्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत ही गुडन्यूज दिली. लवकरच शशांकच्या घरी पाळणा हलणार असून तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याचा हा आनंद त्याने आपल्या प्रेक्षकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

शशांक ही आनंदाची बातमी शेअर करत म्हणाला “2025 चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

 शशांक व प्रियांका आई-बाबा होणार असल्याचं समजताच मराठी कलाकारांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितिक्षा तावडे, तन्वी मुंडले, सुकन्या मोने, आशय कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सलील कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर या सगळ्या कलाकारांसह नेटकऱ्यांनी शशांकच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत केतकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.