Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अश्लाघ्य शब्दात कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला शशांकने खडसावले!

अश्लाघ्य शब्दात कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला शशांकने खडसावले!

या यूजरने कोणतेही ताळतंत्र न बाळगता अश्लाघ्य शब्दांचा वापर केल्याने शशांकनेही त्याला त्याच भाषेत खडसावावं लागले.

Related Story

- Advertisement -

खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला प्रेक्षकांच्या जितक्या वाईट प्रतिक्रिया सहन कराव्या लागतात तितकी त्याची लोकप्रियता अधिक वाढते. एखाद्या खलायकाला मिळणाऱ्या या नकारात्मक प्रतिक्रिया उत्कृष्ट अभिनयाची पोचपावती समजता येते. छोट्या पडद्यावरचा चॉकलेटबॉय अशी ओळख असलेला अभिनेता शशांक केतकर पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारताना दिसला. मात्र फेसबुकवर एका युझरने ताळतंत्र न बाळगता घाणेरड्या भाषेत शशांकवर कमेंट केली. मात्र शशांकच्या फेसबुक पेजवरील एका पोस्टवर यूझरने घाणेरड्या भाषेत प्रश्न केला होता. मात्र यावर शशांकचा पारा चांगलाच वाढला. व त्यानेही त्यावर खणखणीत प्रतिउत्तर दिले. व कलाकारांनासुध्दा रिस्पेक्ट द्या, अधिक पुण्य लाभेल, असा सल्ला दिला.

- Advertisement -

झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरु झालेली मालिका ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवले. या मालिकेत शशांक केतकरने समरप्रताप जहागिरदार ही भूमिका साकारली होती. नेहमीच सकारात्मक भूमिका साकारणारा शशांक अचानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणे हे सर्वांसाठीच आश्चर्यचकित होतं. या मालिकेतील मुख्य नायिका मानसी हिला छळणारा अॅटगॉनिस्ट बॉस अशी शशांकची व्यक्तीरेका पाहून सहाजिकच प्रेक्षकांनी त्याच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र या यूजरने कोणतेही ताळतंत्र न बाळगता अश्लाघ्य शब्दांचा वापर केल्याने शशांकनेही त्याला त्याच भाषेत खडसावावं लागले.


हे वाचा-  कोरोना संकटातही २३ एप्रिललाच थलायवी रिलिज करणार- कंगणाचा फाजील हट्ट

- Advertisement -