घर मनोरंजन 'तिने' माझ्याकडून 3 महिन्यांत 3 लाख घेतले; तुनिषाच्या आईचा खुलासा

‘तिने’ माझ्याकडून 3 महिन्यांत 3 लाख घेतले; तुनिषाच्या आईचा खुलासा

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. शिवाय तिचे कुटुंबीय देखील पूर्णपणे खचून गेले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली असून शिझान खानच्या जामीन अर्जावर येत्या 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. तुनिषा शर्माच्या कुटुंबियांच्या वकिलांनी पुढील तारीख मागितल्याने आजची सुनावणी तहकूब करण्यात आली.

2 जानेवारी रोजी शीजानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान, त्यानंतर आता तुनिषाच्या आईने पुन्हा शीजान खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. शिवाय या वेळी त्यांनी तुनिषाचा एक ऑडिओ देखील शेअर केला आहेत. ज्यातून तुनिषाचे आईवर किती प्रेम होते हे दिसून येत आहे. तसेच तिच्या आईने तुनिषासोबतच्या चॅटचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.

- Advertisement -

यावेळी तुनिषाची आई म्हणाली की, “माझ्या मुलीवर माझे खूप प्रेम होते पण शीजानचे कुटुंबीय सांगतायत की, मी तिच्यावर दबाव टाकायचे जे खोटे आहे. खरंतर, शीजानच्या घरचे तुनिषाकडून मला न आवडणाऱ्या सर्व गोष्टी करायला लावायचे. त्यानंतर वनिता शर्माने तुनिषाचा एक ऑडिओ ऐकवला ज्यामध्ये ती म्हणते, ‘माम्मा, मी तुझ्यावर किती प्रेम करते हे मी सांगू शकत नाही. तू माझ्यासाठी जे काही करतेस ते मी तुला सांगू शकत नाही, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी लवकर घरी येईन.”

पुढे वनिता शर्मा म्हणाल्या, “हे मॅसेज तुनिषाच्या मृत्यूच्या 3 दिवस आधीचे म्हणजेच 21 डिसेंबर 2022 चे आहेत. मी पहिल्यांदाच तुनिषाच्या पाळीव कुत्रा नॉडीसोबतचे फोटो शेअर केले होते, तेव्हा ती खूप खुश झाली होती.”

- Advertisement -

तुनिषाने आईकडून 3 महिन्यात घेतले 3 लाख
शीजान खानच्या कुटुंबावर आरोप करत वनिता शर्मा म्हणाल्या की, “काही दिवसांपासून तुनिषा उर्दू शिकत होती आणि बोलत देखील होती. तिने हिजाब देखील घरी आणला होता आणि मी तिला याबद्दल विचारल्यावर तिने मला हिजाब घालायला आवडत असल्याचे सांगितले. शिवाय तुनिषाने माझ्याकडून 3 महिन्यांत 3 लाख रुपये घेतले होते. या पैशाचे तिने काय केले हे मला माहीत नाही. लडाखवरून आल्यानंतर तिने मला सांगितले की शीजानने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले आहे. त्यावेळी मी तिला शोमध्ये लक्ष देण्यास सांगितले होते.”

 


हेही वाचा :

शाहरुखचा डुप्लीकेटला बघितलंय का? दिसतो एकदम सेम टू सेम

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -