घरमनोरंजनतुनिषा आत्महत्येप्रकरणी शीजानच्या कुटुंबीयांचा होणार तपास?

तुनिषा आत्महत्येप्रकरणी शीजानच्या कुटुंबीयांचा होणार तपास?

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवरील मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. वसईच्या कामन परिसरातील एका स्टुडिओमध्ये ही घटना घडली होती. हिंदी वाहिनीवरील ‘दास्तान-ए-काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकरात होती. तुनिषाच्या आत्महत्येनंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शीजान खानला अटक केली असून गेल्या अनेक दिवसांपासून शीजान पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात तिचे मामा पवन शर्मांनी आता पोलिसांना कथित आरोपी शीजान खानच्या कुटुंबीयांचा तपास करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

शीजानच्या कुटुंबावर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, तुनिषाच्या काकांनी सांगितले की, “आम्ही गृह विभागात गेलो आणि या प्रकरणाला लवकरात लवकर कोर्टामध्ये नेण्याचा आग्रह केला. आम्ही त्यांना सांगितले की, शीजान खानच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील या प्रकरणात सहभागी आहेत. या प्रकरणाचा तपास होईल.”

दरम्यान, आता शीजानसोबतच त्याच्या कुटुंबीयांचा देखील तपास केला जाऊ शकतो. 23 जानेवारी रोजी कथित आरोपी शीजान खानने मुंबई हायकोर्टामध्ये जामीनासाठी याचिका दाखल केली होती आणि या प्रकरणामध्ये आपल्यावर झालेले आरोप देखील फेटाळले होते.

- Advertisement -

आत्महत्येपूर्वी झाला होता ब्रेकअप

काही दिवसांपूर्वी शीजानने आत्महत्या झाली त्यादिवशीचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला होता. आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषाने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही, आत्महत्येच्या दिवशी देखील सेटवर तुनिषाने काही खाल्ले नव्हते. शीजानने तुनिषाला खाण्याचा आग्रह धरला, पण तिने नकार दिला, यावेळी शीजान शूटिंगसाठी मेकअप रुममधून बाहेर पडला. पण बराचवेळ झाला तुनिषा मेकअप रुममधून बाहेर न आल्याने शीजान पुन्हा तिथे आला. यावेळी त्याने मेकअप रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून लॉक होता. यावेळी त्याने तुनिषाला हाक मारली मात्र त्याने तिच्या हाकेलाही प्रतिसाद दिला नाही. यावेळी शीजानने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मेकअप रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, यावेळी शीजानने तुनिषाला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


हेही वाचा :

पॉल भावंडांनी गायलं ‘बेशरम रंग’ गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -