HomeमनोरंजनShefali Jariwala : कांटा गर्लचा पतीसोबत खुलेआम रोमांस, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी काढले...

Shefali Jariwala : कांटा गर्लचा पतीसोबत खुलेआम रोमांस, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

Subscribe

अभिनेत्री शेफाली जरीवालाचा तिच्या पतीसोबतचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पॅपराझींच्या माध्यमातून शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी टीकांचा मारा केला आहे. या व्हिडीओमध्ये पराग आणि शेफाली लिपलॉक करताना दिसत आहेत आणि हे पाहून नेटकऱ्यांनी शाब्दिक मर्यादा ओलांडल्या आहेत.

अभिनेत्री शेफाली जरीवाला ही आजही ‘कांटा लगाsss’ या गाण्यामुळे प्रसिद्ध आहे. 1972 साली आलेल्या ‘समाधी’ या सिनेमातील गाण्याचे 2002 साली नवे व्हर्जन रिलीज झाले होते. ज्यामध्ये अभिनेत्री शेफाली जरीवाला दिसली होती. तिचं हे गाणं इतकं गाजलं होतं की, रेकॉर्ड वर रेकॉर्ड ब्रेक झाले होते. या गाण्याची जादू आजही रसिक प्रेक्षकांवर कायम आहे. शेफाली अभिनय क्षेत्रापासून सध्या दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा पतीसोबत लिपलॉक करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामुळे नेटिझन्सने तिला प्रचंड ट्रोल केले आहे. (Shefali Jariwala got trolled due to viral video)

शेफाली- परागचा खुलेआम रोमांस

‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफारी जरीवाला सिनेविश्वापासून बरंच अंतर राखून आहे. मात्र, सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. शिवाय रिऍलिटी शोमधील सहभागामुळे आणि बोल्ड अंदाजामुळे आपोआपच ती चर्चेचा विषय ठरते. नुकताच तिचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये शेफाली तिचा पती पराग त्यागीसोबत एअरपोर्टवर रोमँटिक होताना दिसतेय. यावेळी दोघांनी भेट होताच केलेला लिपलॉक नेटकऱ्यांना चांगलाच खटकला आहे. सार्वजनिक ठिकाणी दोघांचा लिपलॉक करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी शब्दाच्या तलवारी वापरल्या आहेत.

नेटकऱ्यांनी काढले वाभाडे

अभिनेत्री शेफाली जरीवालाचा तिच्या पतीसोबतचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पॅपराझींच्या माध्यमातून शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी टीकांचा मारा केला आहे. या व्हिडीओमध्ये पराग आणि शेफाली लिपलॉक करताना दिसत आहेत आणि हे पाहून नेटकऱ्यांनी शाब्दिक मर्यादा ओलांडल्या आहेत. एका नेटकऱ्याने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे की, ‘सगळे दिखावे यांना कॅमेरासमोरचं करायचे असतात, थोडं वास्तविकतेत जगा ना’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


तर आणखी एकाने लिहलंय, ‘हे सगळं घरी करून या.. सार्वजनिक ठिकाणी असे चाळे तुम्हाला शोभत नाहीत’. अन्य एकाने लिहिलं, ‘तुम्हाला घर नाहीये का? आता दुपारचं जेवण आणि रात्रीच जेवण पण इथेच करा’. तर अनेकांनी या वर्तनाचा विरोध करत शेफाली आणि परागला खडे बोल सुनावले आहेत. ‘अशी कृत्ये करून यांच्यासारखे लोक भारतीय संस्कृती खराब करत आहेत..’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

अभिनेत्री शेफाली जरीवाला आणि पराग त्यागी हे कपल त्यांच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. लग्नाआधी बरीच वर्षे एकमेकांसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये कोर्ट मॅरेज केले. त्याआधी 2004 मध्ये शेफालीने हरमीत सिंगसोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या 5 वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

हेही पहा –

Shah Rukh Khan : SRK ला राज्य सरकारकडून मन्नतसाठी मिळणार 9 कोटी रुपये, काय प्रकरण?